तुमसर : नगर परिषद तुमसर येथे सन २०१७-२०१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३६४ घरकुलांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र शासनाने व राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची निधि दिला. घरकुल बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र केंद्र शासनाकडून अजूनही घरकुल संदर्भात कोणताही निधी दिले नसल्याने तुमसर शहरातील ३६४ घरकुल अडले आहेत. तो निधी शासनाने तात्काळ द्यावा अन्यथा दहा दिवसानंतर तुमसरातील घरकुल लाभार्थ्यांसह नगराध्यक्ष व संपूर्ण नगर सेवक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत उपाध्यक्षा गीता कोंडेवार, नगरसेवक अमरनाथ रगडे, मेहताबसिंग ठाकूर, सुनील पारधी, पंकज बालपांडे, बाळा ठाकूर, रजनीश लांजेवार, सलाम तुरक, किरण जोशी अर्चना भुरे, आदी उपस्थित होते. तुमसर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा गाजावाजा करीत सण २०१७ मध्ये
शहरातील अडीच हजारांच्या ही वर लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते आलेल्या अर्जाची छाननी नंतर १२९० अर्ज ग्राह्य धरून अर्जाच्या पडताडणी नंतर ३६४ लाभार्थ्यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली होती. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून दीड लक्ष रूपये तर तर राज्य शासनाकडून एक लक्ष रुपये असे एकूण अडीच लक्ष रुपये लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरीता मिळणार होते. त्यानुसार राज्य शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये ४० हजार रुपये व दि ४ जून २०१९ ला ४० हजार रुपये असे दोन हप्ते देवु केले. मात्र केंद्र शासनाकडून दीड लाखापैकी एक निधी तुमसर नगर परिषदेला मिळाला नाही उलट साकोली, पवनी, भंडारा येथे केंद्रा कडून घरकुल करिता निधी प्राप्त झाले असून तुमसर नागरपरिषदेला नाही याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरत आहे या अगोदर ही घरकुलाचे पैसे मिळावे म्हणून नगराध्यक्ष या नात्याने पत्रव्यवहार करून भेट घेतली. अनेकदा शासन प्रशासनाला तक्रारी चे निवेदन दिले मात्र एक दमडी ही तुमसर नगर परिषदेला मिळाली नाही व लाभार्थी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत असून लाभार्थ्यांत न प प्रशासना विरोधात असंतोष खदखदत आहे. त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता प्रशासनाने वेळीच दखल घेत दहा दिवसाच्या आत घरकुल निधी द्यावा अन्यथा घरकुल लाभार्थ्यांसह नगराध्यक्ष व नगरसेवक रस्त्यावर उतरून आंदोलनाचे हत्यार उपासल्यास होणाऱ्या अनुचित प्रकारास प्रशासन जवाबदार राहणार असल्याचा इशारा यावेळी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिला आहे.