लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत. म्हणून शासन, प्रशासन व संबंधित विभागाने वेलतूर - आंभोरा ते मौदी -बोरगाव दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केली आहे.ग्रामपंचायत निवडणूका, महसूल कर्मचाºयांचा संप, आचारसंहिता व पोलिस विभागाच्या सुचनामुळे भाकपची जनअभियान बाईक रॅली स्थगीत करण्यात आली. त्यानंतर लगेच दि.१३ आॅक्टोंबरला राणा भवन, भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा किसान सभेचे तालुका अध्यक्ष अरुण पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यासभेत हिवराज उके मार्गदर्शन करीत होते.सभेत हिवराज उके यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुध्द भाकपच्या देशव्यापी जनअभियानाच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रश्नांवर दुर्लक्ष केल्यास जनआंदोलन करण्याचे आवाहन केले.त्यात प्रामुख्याने विविध मागण्यांचा समावेश आहे. मोदी सरकारने विदेशात काळाधन ठेवणाºया पनामा पेपर्समधील भारतीयांची नावे जाहीर करावे, भांडवलदारांवरील बुडीत कर्जे वसुल करावे, भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बर्खास्त करावे, महागाईवर आळा, नोटबंदी व जीएसटीच्या दुष्परिणामांवर उपाय, शेतकºयांना कर्जमुक्ती, शासकीय हमीभाव केंद्रे सुरु करुन उत्पादन खर्चापेक्षा दिडपट भाव, के जी टू पीजी सर्वांना समान मोफत शिक्षण, सर्वांना उच्च दर्जाची मोफत आरोग्य सेवा, सर्वांना राशनवर स्वस्त दरात धान्य, साखर, केरोसीन, डाळ, घरगुती गॅस, पेट्रोल डिजेलचे दर ५० टक्के कमी करा, भारनियमन बंद करुन विजेचे दर कमी करा, प्रकल्पग्रस्तांचा २.१० लाखांचा पॅकेज लवकर द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. नागरिकांनी भाकपच्या जनअभियानात व जनआंदोलनात सहभागी व्हा असे ही आवाहन हिवराज उके यांनी केले.सभेचे संचालन गजानन पाचे यांनी केले तर समारोप अरुण पडोळे यांनी केले. या प्रसंगी प्रामुख्याने रत्नाबाई इमले, माणिकराव कुकडकर, सदानंद इलमे, सुखराम धनिस्कार, शिशुपाल अटारकर, गौतम भोयर, हिरालाल कुरंजेकर, युवराज गजभिये, दिलीप ढगे, महादेव पेशने, दिलीप क्षिरसागर, वामनराव चांदेवार इत्यादिंचा समावेश होता.
वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 9:39 PM
गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
ठळक मुद्देहिवराज उके यांची मागणी : भाकपच्या सभेत विविध मागण्यांवर मार्गदर्शन