प्रकरण घोडेझरी येथील : ग्रामपंचायत, शेतकऱ्यांची तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील घोडेझरी येथील मामा तलाव गट क्रमांक ४१७ अंतर्गत तलाव गेटचे बांधकाम अयोग्य पद्धतीने व कंत्राटदाराच्या स्वमर्जीने सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायत व लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, कार्यकारी अभियंता भंडारा यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या तलावाला एकूण ४ गेट असून यातील क्रमांक १ ला ५ एकर ओलीत आहे. या गेटचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. क्रमांक २ व ३ चे ओलीतक्षेत्र अंदाजे २०० फुट क्रमांक ४ चे ओलीत क्षेत्र अंदाजे २ एकर आराजी आहे. बांधकाम कंत्राटदाराने किंवा संबंधित अभियंत्यांनीे ओलीत क्षेत्रानुसार गेट बांधकाम करणे गरजेचे होते. तसेच गेट नंबर १ च्या खोलीनुसार गेट नं. १,२,३, ची खोली एक फुटाने बांधकाम आत खोलीवर सुरू करावे, या सर्व बाबींचा त्वरीत अभ्यास करून सर्व ओलीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी केली आहे. मुख्यत: गेट क्रमांक २ ला प्रथम प्राधान्य देऊन खर्च होत असलेल्या निधीला व शेतीला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
माजी मालगुजार तलाव "गेट"चे बांधकाम निकृष्ट
By admin | Published: June 04, 2017 12:18 AM