शहरातील असामाजिक तत्वांचे कृत्य
(फोटो)
तुमसर: शहरातील नेहरू पटांगणावरील रस्ता व नाली बांधकाम हे डी पी प्लॅन नुसार व शासना मार्फत मिळालेल्या मंजुरी नुसार सुरू आहे मात्र काही असामाजिक तत्व हे नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत शहरात गैरसमजुती पसरवून नगरपरिषदेची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य करीत असून विकास कामात अळथळे निर्माण करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा गीता कोंडेवार, विरोधी पक्षनेते अमर रगडे, सभापती सुनील पारधी, मेहताब ठाकूर, पंकज बालपांडे, नगरसेवक बाळा ठाकूर, सलाम तुरक ,विक्रम लांजेवार, तिलक गजभिये मुख्याधिकारी विजय देशमुख सह सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी याबाबत
खुलासा करतांना सांगितले की शासनामार्फत मंजूरी मिळालेप्रमाणे नाली आणि सिमेंट रस्त्याचे कामे सुरू आहेत. डी.पी.प्लाननुसार सदर नेहरू पटांगणावर १२ मीटर चा रस्ता मंजूर असून नगररचना विभागाचे अधिका-यांनी सुध्दा कामाची शहानिशा केली आहे 12 मीटर रस्त्याचे बांधकाम केल्यास पटांगण कमी होईल याचे भान ठेवूनच नगरपरिषदेने त्याठिकाणी ३ मी. रस्ता आणि १ मी. ची नाली बांधकाम करून उर्वरित जागा ही पटांगणासाठी सोडलेली आहे. सदर पटांगणावरुन माकडे शाळा, नेहरू शाळा, एस एन मोर कॉलेज व वसाहती कडे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो रस्ता नसल्याने दुचाकी, चारचाकी ,पादचारी, व सायकल स्वार पटांगणाच्या आतून ये जा करीत होते त्यामुळे पटांगणावरील खेळाडू ना त्याचे त्रास होत होते आता तो रस्ता तयार झाल्याने त्याच रस्ता चा वापर होईल तसेच पटांगणावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने खेळाळूना त्रास होत होते मात्र आता त्या पाण्याचा निचरा त्या नाली वाटे होणार असल्याने पटांगण खुले राहणार आहे मात्र शहरातील काही असामाजिक तत्व हे नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत शहरात गैरसमजुती पसरवून नगरपरिषदेची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य करीत असून विकास कामात अळथळे निर्माण करीत
असल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळून लावले आहे