लोकमत न्यूज नेटवर्कविरली-बु. : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लाखांदूर-पवनी मार्गावर विरली बुज येथे रस्त्याच्या दुतर्फा सुरु असलेले नाली बांधकाम जागेच्या वादात अडकले आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा वाद अद्याप कायम असून गेल्या १५ दिवसापासून खोदलेल्या नालीमुळे नालीलगतचे गावकरी आणि व्यावसायिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.सिंदपुरी ते अर्जूनी (मोरगाव) रस्त्याच्या देखभाल व दुरुस्ती कामांतर्गत येथे रस्त्याच्या दुतर्फा ५०० मीटर लांबीच्या नालीचे बांधकाम सुमारे दोन महिन्यांपासून संथगतीने सुरु आहे. यात एका बाजूचे सुमारे शंभर- दिडशे मिटरपर्यंत नालीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र या बाजूला कसलाही अडथळा नसतांना पुढील बांधकाम गत १५ दिवसांपासून रखडले आहे. या खोदलेल्या नालीमुळे नालीलगतचे नागरिक, वृध्द व्यक्ती आणि लहान मुलावर वेळप्रसंगी एखादा बरावाईट प्रसंग ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुसऱ्या बाजूच्या नालीचे खोदकाम सुरु असतांना या बाजूच्या काही नागरिकांनी नालीचे बांधकाम आपल्या मालकीच्या जागेतून होत असल्याचे सांगून नालीचे खोदकाम रोखले. यापूर्वी ४० फूटावर असलेली नाली आता बांधकाम विभागाने ४५ फुटावर आणल्याचा या नागरिकांचा आरोप आहे. तर शासकीय परिपत्रकानुसारच नालीचे बांधकाम सुरु असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. जुन्या ४० फूटावरील नालीलगत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन असल्यामुळे खोदकाम करतांना या पाईपलाईनला होणारा धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने नाली पाच फुट सरकवल्याचा नाली बांधकामाला विरोध करणाºया नागरिकांचा आरोप आहे.बांधकाम विभागाच्या बोटेल्या धोरणामुळे गेल्या १५ दिवसापासून जागेचा वाद अद्याप कायम असून काही अंतरापर्यंत खोदलेल्या नालीमुळे नालीलगतच्या व्यवसायीकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. नाली बांधकामास विरोध करणारे नागरिक ग्रामविकासात खोडा घालत असल्याचा काही गावकऱ्यांचा आरोप आहे.वाद- प्रतिवादाच्या फेºयात नालीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे नाली शेजारी वास्तव्य करणाºयांच्या जीवाला धोका होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी यावर वेळीच तोडगा काढण्याची नितांत गरज आहे.प्रस्तावित नालीचे बांधकाम आमच्या मालकीच्या जागेतून होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने आमची जागा अधिग्रहीत करुन जागेचा मोबदला द्यावा, त्यानंतरच नालीचे बांधकाम करावे.- संजय कोरेमाजी उपसरपंच, विरली बु.नाली बांधकामास विरोध करणाºया नागरिकांशी चर्चा करुन लवकरच जागेचा वाद सोडविण्यात येईल आणि रखडलेले नालीचे बांधकाम पूर्ववत सुरु होईल.- आर. एन. ठाकूर, कनिष्ठ अभियंता, सर्वाजनिक बांधकाम उपविभाग, लाखांदूर
जागेच्या वादात अडकले नालीचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:50 AM
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लाखांदूर-पवनी मार्गावर विरली बुज येथे रस्त्याच्या दुतर्फा सुरु असलेले नाली बांधकाम जागेच्या वादात अडकले आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा वाद अद्याप कायम असून गेल्या १५ दिवसापासून खोदलेल्या नालीमुळे नालीलगतचे गावकरी आणि व्यावसायिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त । विरली परिसरातील गावकरी, व्यावसायीक त्रस्त