लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भरपावसात रांग लावूनही बांधकाम कामगारांना कीट मिळत नसल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी सोमवारी सकाळी १० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत मार्ग सुरळीत केला.गत दोन महिन्यांपासून बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट वितरीत केली जात आहे. तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील बांधकाम कामगारांना कीटचे वितरण सुरू आहे. दोन तालुक्यातून ५० हजाराहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. दररोज येथे पहाटेपासून रांगा लावल्या जातात. रात्री उशिरापर्यंत बांधकाम कामगार रांगेत उभे असतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय असते. गत दोन दिवसांपासून सुरक्षा कीट मिळत नसल्याने बांधकाम कामगारात असंतोष खदखदत होता.सोमवारी शेकडो कामगारांनी रांग लावली. परंतु कुणीही पेटी वितरण करण्यासाठी आले नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले. शेकडो महिला व पुरूष बाजार समितीसमोरील भंडारा राज्य मार्गावर येवून ठिय्या देवून बसले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यानंतर कामगारांची समजूत काढून रस्ता मोकळा करण्यात आला.
बांधकाम कामगारांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:24 AM
भरपावसात रांग लावूनही बांधकाम कामगारांना कीट मिळत नसल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी सोमवारी सकाळी १० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत मार्ग सुरळीत केला.
ठळक मुद्देकीट न मिळाल्याचा संताप : तुमसर बाजार समितीसमोर आंदोलन