लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.गोंडउमरी, पिपरी ते सौंदड या मार्गावर एक नाला आहे. हा नाला गोंडउमरीला लागून आहे. या नाल्यावर एक लहानपूल असून त्याची दहा वर्षापुर्वी मोडतोड झाली आहे. या क्षतीग्रस्त पूलाची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत येणाºया गोंडउमरी व परिसरातील इतर गावात वास्तव्यास असणाºया शेतकºयांची शेती पुलाच्या त्या भागाला म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात येते. जवळपास २०० एकर शेती असुन खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकºयांना पूल ओलांडून जावे लागते. परंतू पहिल्याच पावसात या पुलाची स्थिती अंत्यत बिकट झाली आहे. नाल्यामुळे पूल पोखरला असून सर्वत्र पाणी साचले आहे. या पुलावरुन बैलबंडी, ट्रॅक्टर अशी वाहने शेतावर नेणे अडचणीचे झाले आहे. मशागत, पेरणी, रोवणी व इतर कामे करण्यासाठी कोणतेही वाहन नेता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. प्रसंगी दमदार पावसामुळे नाला ओलाडणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्घटनेचा बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक योजना अशा योजनेतून या पुलासाठी राहत निधी उपलब्ध होऊ शकते. मात्र राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने या पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगण्याशिवाय शेतकºयांना उपाय नाही.
पुलामुळे तुटतो शेतकऱ्यांचा संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 9:54 PM
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.
ठळक मुद्देदोन जिल्ह्याच्या सीमेत अडकले पूलाचे काम : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ