शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नगरपरिषद अस्तित्वानंतरही होतोय दूषित पाणीपुरवठा

By admin | Published: March 10, 2017 1:30 AM

नाही म्हणता म्हणता साकोलीला नगरपरिषद अस्तित्वात आली. नगरपरिषद झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा नागरिकांना मिळाव्यात

सेंदुरवाफा येथे पाण्याची अपुरी व्यवस्था : साकोलीत फक्त एकाच वॉर्डात मिळतेय नळाचे पाणीसंजय साठवणे  साकोलीनाही म्हणता म्हणता साकोलीला नगरपरिषद अस्तित्वात आली. नगरपरिषद झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा नागरिकांना मिळाव्यात त्या तर दुरच राहिल्या उलट या सुविधांवर साधी चर्चाही सुरू झालेली नाही. अशाच जिवंत समस्या ठरलेल्या साकोली व सेंदुरवाफा वासीयांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. कारण दोन्ही गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी एकमेव योजना पांढरा हत्ती ठरली आहे.साकोली व लाखनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून १९ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना तयार केली. सदर योजना तयार होऊन जवळपास दहा वर्षाचा कालावधी लोटला. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुटप्पी धोरणामुळे ही योजना निकामी झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे साकोली तालुक्यात साकोली, जांभळी, शिवणीबांध, खंडाळा, सावरबंध, पिंडकेपार, बोदरा, सेंदुरवाफा तर लाखनी तालुक्यातील पोहरा, लाखोरी, पिंपळगाव, मानेगाव, पेंढरी, सोनेगाव, सावरी, सोमलवाडा, गोंडसावरी व रेंगेपार कोठा अशा दोन्ही तालुका मिळून १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी ही योजना अस्तित्वात आली.ही योजना तयार होवून दहा वर्षाचा कालावधी लोटला. मात्र योजनेचा लाभ नागरिकांना होवू शकलेला नाही. या योजनेसाठी गडकुंभली टेकडीजवळ उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे शुद्ध पाणी नागझिरा रोड साकोली येथील पाण्याच्या टाकीत सोडून या टाकीतून १९ जणांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार होता. यासाठी साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावासह १९ गावातही पाईपलाईनचे काम पुर्णत्वास नेण्यात आले. पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद प्रशासन आपल्याकडे घेण्यास तयार नसल्यामुळे हस्तांतरणाअभावी ही योजना तशीच निकामी ठरली आहे.यापूर्वी साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होत होता. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले व पाईपलाईन निकामी झाली तेव्हापासून सेंदुरवाफा येथे नळाचे पाणी बंद आहे. दुसरीकडे साकोली येथेही फक्त एकाच वॉर्डात नळाचे पाणी मिळते उर्वरित वॉर्डात विहिरी किंवा बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.