आॅनलाईन लोकमतभंडारा : पॅनकार्ड क्लब कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी शासनाने उंबरठे झिजवावे लागत आहे. यात गुंतवणूकदार व मार्केटिंग प्रतिनिधी अडकले आहेत. सेबीच्या कारभारामुळे संतप्त गुंतवणूकदारांनी मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.लढा वेलफेअर फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष दिनेश सेचरे, पी.के. भुरे, ए.एन. टांगले, कल्पना गायधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पॅनकार्ड क्लब कंपनीत जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी त्यांच्या घामाचा कोट्यवधी रूपयांचा पैसा गुंतवणूक केला. कालांतराने सेबीने या कंपनीचे सर्व कागदपत्रे व मालमत्ता ताब्यात घेतल्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांचा पैसा परत मिळाला नसल्याने आर्थिक चणचण निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान सेबीने कंपनीची मालमत्ता ताब्यात घेताना गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची जबाबदारी घेतली मात्र मालमत्ता किंवा गुंतवणूकदारांची रक्कमही परत करण्यासाठी सेबीचा मनमानी व गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप या गुंतवणुकदारांनी केला आहे.त्रिमूर्ती चौकात जिल्ह्यातील शेकडो गुंतवणुकदारांनी आज एकदिवसीय आंदोलन करून सेबीविरुद्ध निदर्शने केली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने निवेदन देऊन त्यांचे पैसे परत करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. धरणे देण्यामध्ये मनोहर गणवीर, उद्धम मेश्राम, मुकेश चारमोडे, राधेश्याम गभणे, आलोक भोले, भारत गोन्नाडे, मोरेश्वर जगनाडे, रेखा लांजेवार, दिलीप सिंगाडे, रमेश बनकर, राजेश वहिले आदींचा समावेश होता.
‘सेबी’च्या विरोधात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:48 PM
आॅनलाईन लोकमतभंडारा : पॅनकार्ड क्लब कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी शासनाने उंबरठे झिजवावे लागत आहे. यात गुंतवणूकदार व मार्केटिंग प्रतिनिधी अडकले आहेत. सेबीच्या कारभारामुळे संतप्त गुंतवणूकदारांनी मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.लढा वेलफेअर फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष दिनेश सेचरे, पी.के. भुरे, ए.एन. टांगले, कल्पना गायधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात ...
ठळक मुद्देपॅन कार्ड कंपनीचा व्यवहार : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन