लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : ८० टक्के लोक भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून तणाव वाढवितात. १५ टक्के लोक भविष्य आणि ५ टक्के लोक फक्त वर्तमानकाळात जगतात. यामुळे मानवी जीवन तणावग्रस्त बनते. वर्तमान परिस्थितीत जगायला शिकले पाहिजे. डोक्यात नेहमी सकारात्मक विचाराचा बर्फ व वाणीत आनंद देणारे गोडवा आणि जीवनात इतरांबद्दल प्रेम आणि करुणा व्यक्त करणारा प्रेमाचा कारखाना सुरु ठेवल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल असे प्रतिपादन प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू च्या डॉ प्रभा मिश्रा यांनी केले.प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वरठी केंद्राच्या वतीने आठवडी बाजारात सुरु असलेल्या यशस्वी होण्याचे कारणे व तणावमुक्त जीवन यावर आयोजित शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्वेता येळणे , डॉ. प्रा. ज्योती पांडे, प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वरठी केंद्राच्या संचालिका ब्राम्हकुमारी उषा ताई, कामठी केंद्राच्या प्रेमलता ताई, व ललिता ताई उपस्थित होते.डॉ प्रभा मिश्रा यांनी माणसाच्या जीवनात येणाºया तणावाची कारणे आणि उपाय याचे सुंदर विवेचन केले. माणसाच्या जीवनात अभाव, प्रभाव व दबाव या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असून त्यापासून जीवन वेदना देणारे ठरते, असे त्यांनी सांगितले. यासाठी कोणत्याही परिस्थितीत जीवनात अभाव असणाºया गोष्टींचा विचार करू नये, प्रभावात काम केल्यास योग्य तो न्याय देता येत नाही. दबावात काम करणे म्हंणजे मनाविरुद्ध वागणे असे होय. या तिन्ही गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी स्वच्छता व संस्कार यावर मार्गदर्शन करून भारतीय परंपरा जपण्यासाठी मुलांना संस्कार देण्याची गरज असल्याचे सांगितले. युवा पिढी सक्षम व सुशिक्षित होण्यासाठी संस्कारांची खूप जास्त प्रमाणात आवशक्यता आहे. संस्कार रुजवण्यासाठी शालेय जीवनात शिक्षण बरोबर संस्कार आणि मूल्य जोपासण्याची जाणीव त्यांना करून देण्याची काळाची गरज आहे. संचालन प्रेमलता ताई व प्रास्ताविक वरठी केंद्राच्या संचालिका व उषा ताई व आभार प्रकाशभाई यांनी मानले.
जीवनात प्रेमाचा कारखाना सुरु ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:17 AM
८० टक्के लोक भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून तणाव वाढवितात. १५ टक्के लोक भविष्य आणि ५ टक्के लोक फक्त वर्तमानकाळात जगतात. यामुळे मानवी जीवन तणावग्रस्त बनते.
ठळक मुद्देप्रभा मिश्रा यांचे प्रतिपादन : वरठीत तणावमुक्त जीवनावर शिबिर