लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात अन्नत्याग आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे. संघटनेचे संस्थापक आ. बच्चू कडू यांनीही याला पाठींबा दिला आहे.जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीत्यांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधी तातडीने वितरीत करावा, दिव्यांग व्यक्तींची नोंद करावी, तीन टक्के गाळे वाटप करावे, खुल्या प्रवर्गातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकूल योजना राबविण्यात यावी, दीड हजार रूपये मानधन द्यावे, उत्पन्नाची अट शिथील करावी, दिव्यांगांना कर्जमाफी देण्यात यावी, भूमिहीन शेतमजूरांना शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ द्यावा, शहीद झालेल्या सैनिकांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत घ्यावे, पेरणी ते कापणीपर्यंत कामे रोहयोच्या माध्यमातून करावी आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करीत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवी मने यांनी दिली. यावेळी शिवदास वाहाने, सुनिल कहालकर, चरणदास सोनवाने, ओमप्रकाश उंदीरवाडे, कृष्णकुमार मेश्राम, एकनाथ बाभरे, लिना साखरे, सिमा कोसरे, विद्या कुकडे, स्रेहा भांबुडकर, मुक्ता सार्वे, रंजन तिरपुडे, नारायण येवले आदींचा समावेश आहे.
दिव्यांगांचे अन्नत्याग आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:28 AM
दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात अन्नत्याग आंदोलन
ठळक मुद्देविविध मागण्यांचा समावेश : बच्चू कडू यांचा पाठिंबा