नीळकंठ फागाे बाहे (५४), रा. म्हाडा काॅलनी, रामनगर, खात राेड, भंडारा, असे मृताचे नाव आहे, तर फुलचंद सुखराम बांते (४८), रा. ओमनगर खाेकरला, भंडारा आणि त्याचा साथीदार तेजराम अरुण धुर्वे (३४), रा. पचखेडी, ता. भंडारा, अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील दवडीपार दर्ग्याच्या मागील जंगलात मालीपार कालव्यात एक अनाेळखी मृतदेह पडून असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून पाेलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी फाेटाे साेशल मीडियावर पाेस्ट करण्यात आले. काही वेळातच हा मृतदेह कंत्राटदार नीळकंठ बाहे याचा असल्याचे पुढे आले. मात्र, त्याचा खून कुणी आणि कशासाठी केला, हे कळायला मार्ग नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नीळकंठ याच्या घराच्या परिसरात चाैकशी सुरू केली. गाेपनीय माहितीच्या आधारे उसने दिलेल्या एक लाख रुपयांसाठी हा खून झाल्याचे पुढे आले. पाेलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फुलचंद बांते याला ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता ताे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याची कसून चाैकशी करण्यात आली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच या खुनात तेजराम धुर्वे याने मदत केल्याचे सांगितले. त्यालाही तात्काळ अटक करण्यात आली.
नीळकंठ बाहे हा कंत्राटदारीचे कामे करीत हाेता. बीएसएनएल कंपनीचे केबल लाइन टाकण्याचे कंत्राट त्याने घेतले हाेते. काही दिवसांपूर्वी आराेपीला एक लाख रुपये उसने दिले हाेते. या पैशाची मागणी नीळकंठ वारंवार करीत हाेता. त्यामुळेच त्याचा काटा काढण्याचा या दाेघांनी निश्चय केला आणि मालीपार तलावाच्या कालव्याजवळ शेल्याने गळा आवळून त्याचा निर्घृण खून केला.
घटनास्थळाला पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांनी भेट दिली. अधिक तपास कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे, पाेलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, तुळशीराम माेहरकर, नितीन महाजन, पाेलीस नायक नंदू मारबते, गाैतम राऊत, कैलाश पटाेले, स्नेहल गजभिये, अशाेक सराेते, संदीप भानारकर, मंगेश माळाेदे, काैशिक गजभिये करीत आहेत.
बाॅक्स
एलसीबीने केले अवघ्या तीन तासांत आराेपी जेरबंद
मालीपार तलावाच्या कालव्यात अनाेळखी मृतदेह आढळल्यानंतर ओळख पटवून अवघ्या तीन तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आराेपींना अटक केली. विशेष म्हणजे सुरुवातीला मृतदेहाची ओळखही पटत नव्हती. साेशल मीडियातून ओळख पटली. मात्र, पाेलिसांपुढे आराेपी शाेधण्याचे माेठे आव्हान हाेते. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारावर आराेपींचा शाेध घेतला. याप्रकरणी दाेघांना अटक करण्यात आली.