बॉक्स
कंत्राटदाराची शेतकऱ्यांशी अरेरावी
कंत्राटदारांने अरेरावी करून शेतजमिनीचे कुंपण व बांधावरील झाडे तोडून शेतकऱ्यांना दमदाटी केल्याची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी न. प. पवनी यांच्याकडे केली आहे. यानंतर प्रभारी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी रस्ता रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तक्रारीत सत्यता असल्याने रस्त्यासाठी उपलब्ध जागेची मोजणी करेपर्यंत काम बंद ठेवण्याचे कंत्राटदारास मौखिक आदेश दिले. तरीही कंत्राटदार रात्री उशिरापर्यंत बांधकाम सुरू ठेवून रस्ता रुंदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करू पाहत आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम थांबवून उपलब्ध जागेचे मोजमाप करावे. रस्त्याच्या कामासाठी बळजबरीने ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा. झाडे तोडलेला मोबदला द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.