लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांसाठी गोवर रूबेला ही लस महत्वाची असून यासाठी सर्व शासकीय विभाग व खाजगी संस्था, अ धिकारी व कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आपले योगदान दयावे व सुदृढ समाजनिर्माण करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.नोव्हेंबर २०१८ मोहीम राबविण्यात येत असून त्या निमित्याने जिल्हा परिष्द सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलल्या जिल्हास्तरीय कार्यशाळे प्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्रघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप , बालरोग तज्ञ डॉ. अशोक ब्राम्हणाकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. माधुरी थोरात, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष धनराज साठवणे, शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापूरे, जागातीक आरोग्य संघटनेचे डॉ.एस.ठोस , डॉ. फुलचंद मेश्राम , शिक्षणाधिकारी प्रकाश कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एल. डी. गिरीपुंजे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांची उपस्थिती होती.प्रास्ताविकातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी, केंद्र शासनाने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. यासाठी टप्प्या टप्प्याने गोवर रुबेला ही लस विविध राज्यांमधील नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ठ करण्यात येत आहे. वयोगटातील एकुण लार्भाथ्यांपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी विद्यार्थी आहेत. गोवर रुबेला लसीकरण मोहिम शुभारंभ झाल्यानंतर किमान चार ते पाच आठवडयांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये पहिल्या तीन आठवडयात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतील. उर्वरीत ४० टक्के लाभार्थींचे गोवर रुबेला लसीकरण, उपकेंद्र सत्राच्या ठिकाणी करण्यात येईल. लाभार्थींना गोवर रुबेला लसीचे १ इंजेक्श्न दिले जाणार आहे. सोईओ रविंद्र जगताप म्हणाले, गोवर रूबेला ही लसीकरण मोहीम आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. शासनाने ठरविलेल्या उदिष्ठानुसार लसीकरण मोहीमेला यशस्वी करण्यासाठी विविध शासकीय विभाग व खाजगी संस्था यांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वांच्या सहकायार्ने ही मोहीम राबविली तर प्रत्येकांचे योगदान लाभेल.या प्रसंगी डॉ.एस.आर. ठोसर, जागतीक आरोग्य संघटनेचे सल्लागार व शिघ्राप्रतिसाद पथकचे अधिकारी डॉ. फुलचंद मेश्राम, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लतीका गरुड, सहाय्यका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . प्रशांत उईके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर व डॉ. आर . डी. कापगते यांनी यांनीहीजिल्हास्तरीय कार्यशाळेला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक , आॅर्डीन्नसं फॅक्टी जवाहर नगर, सनफल्याग कंपनी वरठी व अशोक लेल्यांड कंपनी गडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. श्रीकांत आंबेकर यांनी तर आभार डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले.
सुदृढ समाज निर्मितीसाठी योगदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:23 PM
९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांसाठी गोवर रूबेला ही लस महत्वाची असून यासाठी सर्व शासकीय विभाग व खाजगी संस्था, अ धिकारी व कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आपले योगदान दयावे व सुदृढ समाजनिर्माण करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
ठळक मुद्देरविंद्र जगताप : लसीकरण मोहिमेबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा