शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

देशाच्या विकासात हातभार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 8:58 PM

राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : साकोली येथे शामरावबापू कापगते जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शामरावबापू कापगते जन्म शताब्दी महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा व शामरावबापू सोबत काम केलेल्या निवडक ज्येष्ठ २० कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा रविवारला साकोली येथे पार पडला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनंवता राऊत, माजी आमदार हेमंत पटले, डॉ. राधेश्याम अग्रवाल, मोहन अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, श्यामजी झिंगरे, दादासाहेब टिचकुले, शिवराम गिºहेपुंजे, नेपाल रंगारी, होमराज पाटील कापगते, डॉ. शंकुतला कापगते आदी उपस्थित होते.ना. हंसराज अहीर यांनी शामरावबापू यांच्या जीवनावर भर घातला. त्यांच्या शेतीविषयक समस्याची जाण, शेती विकासाचे प्रयत्न, बालपणापासून संघाचे निष्ठावान प्रथम स्वंयसेवक, संघबंदीच्या काळात कारावास, कुळकायदा विरोधी आंदोलनात सहभाग, सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी समाजात जनजागृती, समाजोन्नतीसाठी सतत प्रयत्नशील, महाराष्ट्र विधानसभेवर जनसंघाचे विधानसभेतील पहिले आमदार, आणिबाणीच्या काळात नागपूर येथे कारावास, अज्ञातशत्रू व्यक्तिमत्व, अशा अनेक कार्याची आठवण केली.ते म्हणाले, भारत देश लोकशाहीला मानणारा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुसंकारीत चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनु शकला. देशात आंतकवादी, नक्षलवादी हल्ले होत आहे. यावर आळा बसण्यासाठी जागतीक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. देशात शांतता व सुव्यस्थेसाठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हेमकृष्ण कागपते यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठान केलेल्या कार्याची माहिती दिली. आभार नगरसेवक अ‍ॅड.़ मनिष कागपते यांनी मानले. याप्रसंगी साकोली तालुक्यासह परजिल्ह्यातील नागरीक व शामरावबापू कागपते प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर