जि.प. पाटबंधारे विभागाचा पुढाकार : कोरड्या तलावात पाण्याचा प्रचंड साठा, शेती, मासेमारीला प्रोत्साहनयुवराज गोमासे करडीउन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट राहतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे, यासाठी जि.प. लघु पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला. मागील वर्षापासून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मॉडेल तलाव म्हणून जिल्ह्यातील तीन तलावांची निवड करण्यात येत आहे. करडीचे गणपती तलाव त्यापैकीच एक सन २०१५-१६ वर्षात सुमारे १७ लाखाच्या खोलीकरणानंतर आज तीनपटीने पाणी साठून तलाव तुडूंब भरलेला आहे. सन २०१६-१७ वर्षापूर्वी सुमारे १९.९० लाख खर्चून तलावाचे खोलीकरण करण्यात आल्याने तलावाची क्षमता १० पटीने वाढण्यास मदत होणार आहे.सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा निधीतून जिल्ह्यातील साकोली, सिरसी, करडी गावातील तलावांची खोलीकरण कामांसाठी निवड करण्यात आली होती. करडी गणपती तलावाच्या विकासाला प्रारंभ झाला. सदर कामासाठी जिल्हा विकास निधीतून सुमारे १७ लाखचा निधी दिला गेला. यातून १५० मीटर लांब, १०० मीटर रूंद व २.५० मीटर रूंद जागेत तलावाचे खोलीकरण पोकलँडच्या सहायाने करण्यात आले. कामाचे कंत्राट लाखनी येथील पोहरकर यांना होते. तलावाच्या खोलीकरणाच्या मातीचा वापर गावातील, बाजारातील खड्डे बुजविण्याबरोबर शेतीच्या विकासासाठी करण्यात आला. झाडांना भरण टाकण्यासोबत दलदलीचे ठिकाणे भरण्यासाठी मोफत माती दिली गेली. एक किलोमीटरपर्यंत गावाच्या गरजेनुसार जमिनीच्या विकासासाठी तलावातील मातीचा मोठा हातभार लागला.सन २०१५-१७ मध्ये पुन्हा जिल्ह्यातील रोंघा, सितासावंगी तलावासोबत करडी गणपती तलावाचा अंतर्भाव जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला. सिद्धी विनायक मंदिर मुंबईच्या ट्रस्टच्या सिएसआर निधीतून १७० मीटर लांब, ८० मीटर रूंद व २.५० मीटर खोल खोलीकरणासाठी १९.९० लाखाचा निधी मिळाला अन तलावाच्या उर्वरित कामाला जोमाने सुरूवात करण्यात आली. सदर कामाचे कंत्राट चुटे एजन्सी भंडारा यांना आहे. खोलीकरणामुळे पुन्हा १० पट पाण्याची पातळी वाढण्याचा मानस व्यक्त होत आहे. मॉडेल तलाव म्हणून विकास होण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता आर.एस. अभियंता संजय चाचीरे यांचे नियोजन सोबत प्रशासनाचा उपक्रम मोलाचा ठरण्याची प्रतिक्रिया गावकरी व शेतकरी वर्गात व्यक्त होत आहेत.मी स्वत: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल याप्रमाणे दरवर्षी तीन तलाव तयार करण्याचा निर्धार केला होता. जलयुक्त शिवार योजनेमुळे त्याला मुर्त रूप देता आले. करडीचे गणपती तलाव त्यापैकी एक आहे. तलावाच्या खोलीकरणातून गावाच्या विकासोबतच शेतीचा समतोल विकास साधता आला. पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. लोकांत जाणीव जागृती होण्यास मदत होऊन आणखी तलाव विकसित करण्याचा मानस आहे. मासेमार बांधवांना, जनावरे व विहिरींना फायदा झाला. पुढील वर्षात आणखी दहापट पाणी वाढण्याची शक्यता आहे.-आर.एस. गुप्ता, उपविभागीय अभियंता जि.प. भंडारा.पाकण मातीमुळे जमिनीची नापिकी संपली. गावातील बाजाराचा व सार्वजनिक हिताच्या जागांचा विकास करता आला. शेतीला ओलीत व जनावरांना दिलासा मिळाला. भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली. ढिवरबांधवांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला. करडी जि.प. क्षेत्रातील ईतर गावातील तलावांचा असाच विकास करण्याचा विचार आहे.-नीलिमा ईलमे, जि.प. सदस्य करडी.
करडी गणपती तलावाचे मॉडेल तलावात रूपांतर
By admin | Published: June 19, 2016 12:20 AM