शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

धडक सिंचन विहिरींसाठी ‘कोअर कमिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:03 AM

धडक सिंचन विहिरींचे बांधकाम झाल्यानंतर त्याचा धनादेश मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना सुमारे महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागत होता.

ठळक मुद्देलघु सिंचन विभागाचा उपक्रम : आठ दिवसांत लाभार्थ्यांना मिळणार धनादेश, शेतकºयांची थांबणार फरफट

प्रशांत देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धडक सिंचन विहिरींचे बांधकाम झाल्यानंतर त्याचा धनादेश मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना सुमारे महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागत होता. हा कालावधी कमी करून लाभार्थ्यांना आठ दिवसात बांधकामाचे धनादेश देता यावा यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या भंडारा उपविभागाने ‘कोअर कमिटी’ स्थापन केली आहे. यातून लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर आठ दिवसात रक्कम मिळणार आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील भंडारा उपविभागात उपविभागीय अभियंता ए.आर. डाखोरे यांनी ही संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ व्हावा यादृष्टीने कर्मचाºयांची कोअर कमिटी स्थापन केली आहे. या कोअर कमिटीचे प्रमुख म्हणून कनिष्ठ सहायक केसरीलाल गायधने यांची नियुक्ती केली आहे. या कमिटीमध्ये उपविभागातील नऊ कंत्राटी अभियंता, चार स्थायी अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यांतर्गत भंडारा उपविभागाचे कार्यक्षेत्र आहे. येथील धडक सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांना एका विहिरीच्या बांधकामाकरिता दोन लाख ५० हजार रूपयांचे अर्थसहाय पुरवठा केल्या जातो. भंडारा जिल्ह्याला एक हजार विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापैकी ५२४ विहिरींचे काम करण्यात येत आहे. त्यापैकी १६० विहिरींचे काम पूर्ण झालेले आहे. अनेक विहिरींचे कामे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले आहेत. ज्या विहिरींचे कामे पूर्ण झाली त्यांना मोबदला मिळविण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये, यासाठी उपविभागीय अभियंता ए.आर. डाकोरे यांनी ही नवसंकल्पना राबविली आहे. या अनुषंगाने बांधकामाची पाहणी सदर कोअर कमिटी बघणार असून त्यानंतर सर्व कागदपत्रांची सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आरटीजीएसने लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम वळती केल्या जाणार आहे. यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची होणारी फरपट थांबण्याचा विश्वास ए. आर. डाखोरे यांनी व्यक्त केला आहे.लाभार्थ्यांची होणारी आर्थिक कुचंबना थांबविण्यासाठी जीपीएस व आरटीजीएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. आठ दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर विहिरींची रक्कम वळती करण्यात येईल. कोअर कमिटीला याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.-ए.आर. डाखोरे,उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग, भंडारा.१६० विहिरींची कामे पूर्णभंडारा उपविभागाला यावर्षात ५२४ विहिरींचे बांधकाम करावयाचे आहे. त्यात भंडारा तालुक्यात १९०, मोहाडी तालुक्यात १५६ तर तुमसर तालुक्यात १७८ विहिरी मंजुर झाल्या आहेत. त्यापैकी भंडारा तालुक्यात ४६, मोहाडी तालुक्यात ५६ व तुमसर तालुक्यात ५८ अशा १६० विहिरी पूर्ण झालेल्या आहेत. ५२४ पैकी ४५२ विहिरींची कामे सुरू असून १६० पुर्णत्वास आली आहे.जीपीएस प्रणालीचा वापरविहिरींचे बांधकाम असलेल्या शेतातील विहिरींची माहिती अद्यावत ठेवण्याकरिता लघु पाटबंधारे विभागाने जीपीएस प्रणालीचा वापर केला आहे. या माध्यमातून विहिरींचे बांधकाम व परिसराची तांत्रिकदृष्ट्या सखोल माहिती संग्रहित राहणार आहे. या माहितीच्या आधारे लाभार्थी व त्याच्या विहिरीची माहिती पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्याला मोबदला मिळणार आहे. ही सर्व माहिती राज्य शासनाच्या सरकार पोर्टलवर प्रसारित करण्यात येत आहे.