शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
5
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
6
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
7
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
8
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
9
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
10
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
11
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
12
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
13
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
14
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
15
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
16
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
17
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
18
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
19
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
20
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 

कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा रोपांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:37 AM

भंडारा : संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण ...

भंडारा : संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे, परिसरातील विविध औषधी वनस्पतींचा काढा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत. त्यामुळे आता आपल्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या वन औषधांचे महत्त्व कोरोनामुळे वाढत आहे. यामध्ये विशेष करून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गिलोय, गुळवेल, पुदिना, गवती चहा, कोरफड, शतावरी, कडुनिंब, पिंपळ या वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. परिसरात सर्वत्र आढळून येणाऱ्या कडुनिंबासह गवती चहाचा आज मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विविध रोपवाटिकांमध्ये या रोपांच्या मागणीतही वाढ झाली आहे. कडुनिंबाच्या पानाचा, सालीचा काढा तसेच पानांचा ज्यूस काढून तसेच चहामध्ये अद्रक, गवती चहासारख्या वनस्पतींचा नागरिक आज आवर्जून वापर करीत आहेत. एकंदरीत नैसर्गिक वनसंपत्तीने विपुल असलेल्या भंडारा जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही यामुळे राेजगार मिळत आहे. दररोज औषधांचा आयुर्वेदिक औषधांचा वापर हा नित्यनेमाने केला जात आहे. ज्यांना आयुर्वेदिक औषधाचे महत्त्व माहीत आहे, असे लोक घरच्या घरी कुंड्यांमध्ये तुळस, गवती चहा, अश्वगंधा या रोपांची लागवड करण्यासाठी नर्सरीमध्ये रोपांची मागणी करीत आहेत. सुरुवातीला शोभेच्या रोपट्यांची घरी कुंडीत लागवड केली जायची. मात्र आता त्या ऐवजी औषधी रोपट्यांना मागणी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

या रोपांना आहे प्रचंड मागणी

१. तुळस

तुळस ही एक सर्वत्र आढळणारी बहुगुणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळेच आजही प्रत्येकाच्या दारासमोर तुळस लावण्यात येते. तुळशीचा महत्त्वाचा फायदा खोकला, विषदोष, दमा, उचकी लागणे, खवखव होणे तसेच मळमळ होत असल्यास तुळशीच्या पानांचा वापर उपयुक्त ठरतो. तसेच छातीमध्ये जळजळ, वातदोषाचे शमन करण्यासह तुळस दुर्गंधीचा नाश करते. तसेच तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचा महत्त्वाचा गुणधर्मही आहे.

२. अश्वगंधा

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी इम्प्लीमेंटरीचे महत्त्वाचे गुण असतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्येपासून सुटका होते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी आणखीन मजबूत होतात. त्यासोबतच कोलेस्टेरॉलचा खराब स्तरही कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते.

३. अद्रक

आज घरोघरी प्रत्येकजण चहामध्ये आवर्जून अद्रकचा म्हणजेच आल्याचा वापर करत आहेत. द्रकमध्ये ऑंटीफंगल, ॲंटिसेप्टिक, बायोटीक व्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याबरोबरच विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेदेखील असल्याने आपल्या स्वास्थ्यासाठी कोरोनाकाळात अद्रक महत्त्वाची व मोलाची भूमिका निभावत असल्याने आज आल्याची प्रचंड मागणी बाजारात वाढली आहे.

४. गुळवेल

गुळवेल या रोपाला अमृता असेही अनेक ठिकाणी संबोधले जाते. अस्थमा व श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीला गुळवेल या रोपाचा प्रचंड फायदा होतो. गुळवेल या रोपाच्या काढ्याचा रस काढला जातो आणि तो काढ्याच्या स्वरूपात प्राशन करण्यास दिला जातो. याचा मानवी आरोग्याला चांगला फायदा होतो.

५. अडुळसा

अडुळसा ही आपल्या परिसरातील एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने उगाळून घेतल्यास त्यापासून जो रस तयार होतो, तो रस काढ्याच्या स्वरूपात घेतल्यास शरीरात अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त असून त्याच्या रोपांची मागणीही सध्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

कोट

सध्या कोरोना वाढला असल्याने नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. ज्यांना औषधी वनस्पतींची जाण आहे, ते लोक कडुनिंब, गवती चहा, गुळवेल, वड, पिंपळ अशा रोपांची आमच्याकडे मागणी करत आहेत. औषधी वनस्पतींमध्ये मोठी ताकद आहे. ज्या जाणकारांना हे माहीत आहे ते लोक खरेदीसाठी येत आहेत. आम्ही नर्सरीमध्ये अशी रोपे तयार करून विक्री करीत आहोत.

मंगलमूर्ती येरणे, नर्सरीचालक, आसोला.

कोट

कोरोनामुळे औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे. याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपणही घरच्या घरी बागेत अथवा गच्चीवर ही रोपे छोट्या कुंड्यांमध्ये लावू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग केल्यास आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. भंडारा तालुक्यात अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा दोन शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. त्यांनाही औषधी वनस्पतींबद्दल मार्गदर्शन करीत आहे.

अविनाश कोटांगले, भंडारा तालुका कृषी अधिकारी