भंडारा : येथील युथ युनियनतर्फे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन पेवठा येथे करण्यात आले होते.
युनियनच्यावतीने पेवठा गावातील प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरणाचे महत्त्व व फायदे सांगितले. त्यांच्यामधील जी भीती व गैरसमज होते ते त्यांनी दूर केले. त्यामुळे कोरोनापासून मुक्तता मिळावी यासाठी लसीकरण आवश्यक आहे. प्रत्येकाने लसीचा डोस घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने वर्तविले आहेत. त्यामुळे वेळीच लसीकरण होणे गरजेचे आहे. याचे मार्गदर्शन गावकऱ्यांना प्रोजेक्टरवर सविस्तरपणे करण्यात आले.
या कार्यक्रमात वैष्णवी उमाले, श्रावणी ठाकरे, नीलय देशपांडे, भाविक वैद्य, आयुष राजाभोज, आदित्य घरडे, हिमांशु लेंडे, बाबा बागडे, साहिल भोयर, रितीक बांते, उत्कर्ष शहारे, श्रद्धेय रोडगे, वैभव समरीत, रोहित वाडीभस्मे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.