गतवर्षी नव्यानेच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना आपली शाळा कोणती, वर्ग कोणता, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक कोण, आपले बालमित्र कोण याची साधी ओळखही झाली नव्हती. त्यातच आता कोणाची दुसरी लाट आल्याने यावर्षी तरी शाळेत जायला मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थी किमान काही दिवस तरी शाळेत गेले असल्याने त्यांनी पुढील वर्गाची तयारी चालू केली आहे. जुनी पुस्तके मिळवून अनेकांनी अभ्यास सुरू केला आहे. तरीही विद्यार्थ्यांना मात्र घरीच अभ्यास करण्याचा कंटाळा येऊन गेला आहे.
बॉक्स
यावर्षी शिक्षण ऑनलाईन का ऑफलाईन होणार
कोरोनाची दुसरी लाट राज्यात आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात व्यस्त आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील हे आत्ताच सांगता येत नाही. तरीही १४ जूनला शाळा सुरू झाल्या तरी यावर्षीचे शिक्षण ऑफलाईन असणार का ऑनलाइन असणार, असेही अनेक पालकांमधून संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास ऑफलाईन शिक्षणाचा प्रयोग पुन्हा करावा लागेल का यावरही अनेकांचे विचारमंथन सुरू आहे.
बॉक्स
कोरोना महामारीची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. ही कमी झाल्यानंतरच राज्य शासन शाळांबाबतचा पुढील निर्णय घेणार आहे. अद्याप तरी १३ जूनपर्यंत सुट्टी आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, शाळा सुरू होणार का नाही याबद्दलचा निर्णय राज्य सरकार कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच ठरवणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षक, पालकांचे याकडे लक्ष लागून आहे.
कोट
कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षात अनेक अडचणी आल्या. त्यातच सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय परिसरात शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षणाचे धडे, बालपणातील खेळण्या-बागडण्याच्या शाळेतील जो आनंद आहे तो मात्र मिळालाच नाही. मात्र, अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने यावर्षी सरकार काय निर्णय घेते याची आम्हालाही उत्सुकता लागून आहे.
संतोष मडावी, सहाय्यक शिक्षक, सोमलवाडा.
कोट
गेल्या वर्षभरापासून शाळा नसल्याने माझी दोन्ही मुले घरातच बसून आहेत. त्यांना घरी बसण्याचा कंटाळा येऊन गेला आहे. काही दिवस ऑनलाईन शिक्षण घेतले. मात्र, त्यामुळे मुलांना फक्त मोबाईलचा जास्त छंद लागला. ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव मुलांवर फारसा प्रभाव पडलेला नाही. शाळेची बरोबरी ऑनलाईन शिक्षणाला येऊ शकत नाही.
दीपक गिरीपुंजे, पालक खरबी नाका.
कोट
शाळेत जाऊन फार दिवस झाले. अनेक मैत्रिणी फोनवर करतात. मात्र, शाळेतील मजा काही औरच असते. दररोज घरी बसण्याचा, सतत मोबाईलवर ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा येऊन गेला आहे. दररोज घरी बसून नकोसे वाटत आहे. शाळा कधी सुरू होते आणि कधी एकदाची मी शाळेत जाते असे झाले आहे.
रिद्धी बाभरे, विद्यार्थीनी,भंडारा.