उसर्रा : उसर्रा येथे कोरोना गाव मुक्त अभियानअंतर्गत गावात सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेश पटले उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती भोजराम पारधी, किरण भैरम, मुख्याध्यापक रवींद्र पटले, डॉ. गायत्री चौधरी, ग्रामसेवक वादस्कर, आरोग्य सेवक संजीव बालबुदे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरज शरणागते, हैशोक शरणागते, सेवानिवृत्त कर्मचारी तिलेंद्र पटले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेत गावात कोरोनाविषयी जनजागृती करून प्रत्येकाने कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी समितीचे गठन करण्यात येईल, सदर समिती गावात स्वच्छता राखणे व सोशल डिस्टन्सिंग याकडे लक्ष देईल. तसेच गावातील आठवडी बाजार व गावातील अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते ५ पर्यंत सुरू राहतील. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ग्रामसेवक वडसकार यांनी केले.