शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात एकूण तपासणीच्या १५.३५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 9:25 PM

Bhandara news भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ७८ हजार ६४० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यात ५८ हजार ११६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

ठळक मुद्दे तीन लाख ७८ हजार ६४० व्यक्तींची चाचणीॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटू लागली

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ७८ हजार ६४० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यात ५८ हजार ११६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण तपासणीच्या १५.३५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गत एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. आता हळुहळु रुग्णसंख्या घटू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या अगदी नगन्य होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागली. पहिली लाट ओसरली. मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाला. एकट्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सुमारे ३३ हजार रुग्ण आढळून आले आहेत. सर्वत्र वातावरण भयभीत झाले होते. आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे उपाययोजना करत रुग्णसंख्या आता नियंत्रणात आणली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ७८ हजार ६४० व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता त्यात ५८ हजार ११६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार ४३१, मोहाडी ४२९०, तुमसर ७०२६, पवनी ५९५८, लाखनी ६४४९, साकोली ७१०६ आणि लाखांदूर तालुक्यात २८५६ रुग्ण आढळून आले आहे, तर जिल्ह्यात १०४५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ४८७, मोहाडी ९३, तुमसर ११७, पवनी १०४, लाखनी ९४, साकोली १०१, लाखांदूर ४९ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीच्या १५.३५ टक्के व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी एकाचा मृत्यू; ११९ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात मंगळवारी १६२१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ११९ पॉझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ४३, मोहाडी १३, तुमसर २५, पवनी १८, साकोली १८ आणि लाखांदूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. लाखनी तालुक्यात मंगळवारी एकही रुग्ण आढळून आला नाही, तर १६९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पवनी तालुक्यातील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला.

५६ हजार १४३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार १४३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २३ हजार ५७४, मोहाडी ४१४१, तुमसर ६८१८, पवनी ५७६७, लाखनी ६२६३, साकोली ६८४३ आणि लाखांदूर तालुक्यात २७३७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ९२८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा ३७०, मोहाडी ५६, तुमसर ९१, पवनी ८७, लाखनी ९२, साकोली १६२ आणि लाखांदूर तालुक्यात ७० रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस