लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दाेन दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे दिसत आहे. साेमवारी ५५० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून दहा जणांचा काेराेनाने मृत्यू झाला तर १०९९ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात साेमवारी ११६६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात ५५० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या असून भंडारा तालुक्यात २५३, माेहाडी ३०, तुमसर ४९, पवनी २२, लाखनी १०८, साकाेली ७१, लाखांदूर १७ रुग्णांचा समावेश आहे. साेमवारी १० जणांची काेराेनाने मृत्यूची नाेंद घेण्यात आली. त्यात भंडारा, माेहाडी, तुमसर आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी दाेन तर पवनी आणि साकाेली तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आता मृतांची संख्या ८९० झाली आहे.
साेमवारी १०९९ व्यक्तींनी काेराेनावर मात केली असून आतापर्यंत ४१८५५ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात सारखेच रुग्ण आढळून येत हाेते. मात्र आता दाेन दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी येत असल्याने दिलासा मिळत आहे. नागरिक मात्र काेराेना नियमांचे पालन करताना दिसत नाही.