शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

नगरसेवकाचा खून, कातडे तस्करीने गाजले वर्ष

By admin | Published: December 28, 2015 12:52 AM

तुमसर तालुक्यात २०१५ हे सरते वर्ष नगरसेवक खून प्रकरण, आंतरराष्ट्रीय वाघ तस्कराची तुमसर तालुक्यातील जंगलात वनअधिकाऱ्यांनी मोका चौकशीने हे वर्ष गाजले.

मोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यात २०१५ हे सरते वर्ष नगरसेवक खून प्रकरण, आंतरराष्ट्रीय वाघ तस्कराची तुमसर तालुक्यातील जंगलात वनअधिकाऱ्यांनी मोका चौकशीने हे वर्ष गाजले. एरव्ही शांत असलेल्या तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले.१२ आॅगस्ट रोजी नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर देशी कट्यातून मारेकऱ्यांनी हा हल्ला केला होता. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. नागपुरात उपचारादरम्यान २० दिवसाच्या मृत्यूशी झुंजीनंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सहा आरोपींना तुमसर पोलिसांनी अटक केली. सरत्या वर्षात तुमसर शहरात तीन खून झाले. मंगलमूर्ती सराफा दुकानात १६ लाखांचे सोने चोरीला गेले. तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत २८ चोरीच्या घटना घडल्या. आठ मोठे अपघात घडले आहे. आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर कुट्टू पारधी याने लेंडेझरी जंगलात वाघाची केल्याप्रकरणी दिल्ली व मुंबई येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक लेंडेझरी जंगलात मौका चौकशीकरीता त्याला सोबत घेऊन आले होते. आंबागड (गायमुख) येथे दसऱ्याच्या दिवशी तीन शालेय विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटल्याने सुनिल वाढीवे, राजकुमार टेकाम व सुनिता ठाकरे यांचा मृत्यू झाला होता. गोबरवाही पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डोंगरी (बुज) येथे राष्ट्रीयकृत बँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात दौरे केले. पंचायत समितीवर भाजप-शिवसेनेने कब्जा केला तर जिल्हा परिषदेत राका ८, भाजप १, अपक्ष १ निवडून आले तर काँग्रेसला खातेसुध्दा उघडता आले नाही. या निवडणूकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले.खासदार नाना पटोले यांनी सांसद आदर्श ग्राम म्हणून तालुक्यातील बघेडा गावाची निवड केली. आमदार आदर्श गाव योजनेत विधानपरिषद सदस्य प्रा. अनिल सोले यांनी रोंघा गावाची निवड केली.बहुप्रतिक्षीत बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. ‘स्वच्छ-सुंदर तुमसर’ संकल्पनेंतर्गत नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी एलईडी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे हे येणारे नवीन वर्षाची चाहुल सुखदायक ठरली आहे.तुमसर रोड हे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेले रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर शेकडो रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला. तुमसर रोड येथे रेल्वे उडाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली. कृषी उत्पन बाजार समितीचे विक्रमी धानाची आवक झाली.