युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षाच्या कालावधीत १० विभागांच्या माध्यमातून ३३ गावात एकुण ८७४ कामे पूर्ण करण्यात आली. झालेल्या कामांवर सुमारे १६.५९ लाखांचा खर्च करण्यात आला. कामांमुळे सव्वा मिटरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. संरक्षित सिंचनाचे खरीपातील एका पाण्याचा दुष्काळ संपून चांगले उत्पादन हाती पडले. रबी पिकांचे व भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले, अशी माहिती मोहाडी तालुका जलयुक्त शिवार अभियान समिती सचिव तथा मोहाडी तालुका कृषी अधिकारी विजय रामटेके यांनी दिली.मोहाडी तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात १५ गावात एकुण आठ यंत्रणांच्या माध्यमातून ८१४.८५ हेक्टर आर क्षेत्रावर ३१२ कामे पूर्ण झाली. झालेल्या कामांवर सुमारे ७.९१ कोटींचा खर्च करण्यात आला. कृषी विभागातर्फे एकुण १०४.४३ हेक्टरवर १९३ कामे पूर्ण झाली. सामाजिक वनीकरण विभागामार्फत तीन कामे, ग्रामपंचायत (पं.स.) ६४ कामे, जि.प. लघु पाटबंधारे विभाग २८ कामे, वनविभाग १४ कामे, जलसंपदा विभाग १, जलसंधारण ४, भूजल सर्वेक्षण विभाग ५ कामे पूर्ण झाली.सन २०१६-१७ मध्ये १० गावात कृषी विभागामार्फत ६९.१० हेक्टर क्षेत्रावर ११९ कामे पूर्ण झाली. यावर सुमारे १.६७ कोटींचा खर्च करण्यात आला.सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ काम, पंचायत समितीच्या वतीने १४७ कामे, जि.प. लघु पाटबंधारे विभाग २८ कामे, वनविभाग १५ कामे, पाटबंधारे श्रेणी १-२ कामे, पेंच व्यवस्थापन १ काम, भूजल सर्व्हेक्षण २० कामे, जलसंधारण २ कामे आदी विभागांची एकुण ३३५ कामे पूर्ण झाली. ही कामे १५५.९ हेक्टर करण्यात आली असून कामांवर ५.६९ कोटींचा खर्च करण्यात आला. सन २०१७-१८ या वर्षात ८ गावात कृषी विभागामार्फत १३०.७१ हेक्टर क्षेत्रावर ७४ कामे पूर्ण करण्यात आली. यावर सुमारे १०४.१८ लाखांचा खर्च करण्यात आला. पंचायत समिती अंतर्गत ५८ कामे झाली. जि.प. लघु पाटबंधारे विभागामार्फत १६ कामे पूर्ण झाली. वनविभागातर्फे ५८ कामे, जलसंधारण विभागामार्फत २ कामे, भूजल सर्वेक्षण विभाग १५ कामेपूर्ण करण्यात आली. एकुण २२७ कामांवर २.९९ कोटींची खर्च करण्यात आला अशी माहिती रामटेके यांनी दिली.झालेली उपचाराची कामेसन २०१५ ते २०१८ या वर्षात भूगर्भात पाण्याची पातळी वाढण्यासाठी तसेच पाण्याची टंचाई दूर होण्याबरोबर संरक्षित साठे निर्माण होण्यासाठी सिनाबा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, वळण बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरण व सरळीकरण, मजगी, मजगी पुनर्जीवन, बोडी नूतनीकरण, शेततळे, सिमेंट प्लग दुरुस्ती, के.टी. वेअर दुरुस्ती, ल.पा. तलाव दुरुस्ती, मामा तलाव दुरुस्ती, डी.पी.सी.सी.टी., पाणी साठवण तलाव, सिमेंट बंधारे, गॅबीयन बंधारे, रिचार्ज शाफ्टच्या ८७४ कामे करण्यात आली.२० गावात ३१२ कामांचे नियोजनसन २०१८-१९ या वर्षासाठी आठ विभागांतर्गत एकुण ८१४.८५ हेक्टर क्षेत्रावरील ३१२ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांवर सुमारे ७.९१ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये बोंद्री, धुसाळा, टाकळी, सिरसोली, रोहा, पाचगाव, सिहरी, जांभोरा, नेरला, वरठी, देव्हाडा खुर्द, केसलवाडा, सालेबर्डी, मोहगाव देवी, किसनपूर, लेंडेझरी, निलज बुज., निलज खुर्द, एलकाझरी, बिटेखारी आदी २० गावांचा समावेश आहे.
तीन वर्षात ३३ गावांत १६ लाख ५९ हजारांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 9:46 PM
मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षाच्या कालावधीत १० विभागांच्या माध्यमातून ३३ गावात एकुण ८७४ कामे पूर्ण करण्यात आली. झालेल्या कामांवर सुमारे १६.५९ लाखांचा खर्च करण्यात आला. कामांमुळे सव्वा मिटरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : मोहाडी तालुक्याची १०० टक्के लक्षांक पूर्ती, ८७४ कामे पूर्ण