साकोली : येथील लहरी बाबा मठ येथे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा, गोंदिया तथा सर्वस्तरीय लोककलावंत, साउंड सिस्टम डेकोरेशन, डी जे धुमाल,बँड पार्टी, कॅटरिंग फुलवारी,सभागृह संघटनेच्यावतीने दिनांक १३/९/२०२१, रोज सोमवारला वेशभूषा संगीतमय आंदोलन करण्यात आले.
मंगलमूर्ती सभागृह येथून सुरू झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शिवकुमार गणवीर यांनी केले. यावेळी कलावंतांनी वेशभूषा धारण करून संगीतमयरित्या आंदोलनाला सुरुवात केली. शहरात रॅली काढून आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी शासनाच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविला. कलावंतांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या पटांगणात सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, सर्व कलावंतांची नोंद ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे व्हावी, तशी सूचना सर्व ग्रामपंचायतीमार्फत कलावंतांची यादी तयार करण्यात यावी, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी तहसील व पोलीस स्टेशनमधून देण्यात यावी, साऊंड सिस्टम तथा डीजे धुमाल सभागृह यांना खुल्या पटांगणात वाजविण्यासाठी परवानगी देण्यात यावी, वृद्धकलावंतांची वयोमर्यादा ४५ वर्षे करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार साकोली यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
आंदोलनामध्ये भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, भूमाला कुंभरे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ कलावंत प्रियंका गायधनी, विनोद मुरकुटे, प्रदीप नंदेश्वर, रितेश बाळबुध्ये, नंदू धकाते, अजित गायधने, मनोज बोपचे, ईशवर धकाते, ज्ञानेश्वरी कापगते, परमानंद गहाने, राकेश वालदे, दिलीप कोटांगले, आदेश थुलकर, सोनू मेश्राम राहुल कापगते, संदीप नागदेवे, अंबादास कांबळे, अमोल राऊत, टेंभरे,धनंजय धकाते, ममता करंजेकर, अर्चना कान्हेकर, वनश्री श्रध्ये, शालू निपाने, यशवंत बागडे आदी उपस्थित होते.