शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

काँग्रेसच्या धोरणांमुळे देश उभा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:17 AM

काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.पवनी येथील गांधी भवनात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, वरिष्ठ नेते जिल्हा परिषद माजी सभापती विकास राऊत, आॅल इंडिया फिशरमेन काँग्रेस सेक्रेटरी प्रकाश पचारे, असफाक भाई पटेल, जिल्हा परिषद माजी सभापती हंसा खोब्रागडे, पंचायत समिती सभापती बंडु ढेंगरे उपस्थित होते.पटोले म्हणाले, राज्यावर पूर्वी दीड लाख कोटीचे कर्ज होते, ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. १९७२ साली जनतेने अनुभवलेल्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणित सरकारने नाकारल्या. उलट जीएसटी जुलमी कायदा आणला, उद्योगपतींना त्यांचा फायदा होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळात मंजूर करुवून घेतला. यात मनी बील मंजूर करण्यात आले. चर्चा करू दिली नाही. पंतप्रधान पीक विमा योजना फसवी असून राज्य शासनाने सुरू केलेली एसटी बस प्रवाशांसाठी सुरू असलेल्या अपघात विमा योजनेत प्रत्येक प्रवाशांकडून एक रुपया घेतला जातो. त्यातून दर दिवशी ६७ लाख रुपये प्रवाशांकडून जमा केले जात आहे, हा प्रवाशांवर असेलेला आर्थिक भुर्दंड होय. ह पैसा सरकारला मिळत नसून तो विमा कंपनीच्या खात्यात जातो, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरिबी नाही असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब श्रीमंतांच्या यादीत आले. यामुळे अनेक कुटुंब शासकीय योजनांना मुकणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने ११ अरब ९८ कोटी रुपये प्रसार व प्रचारावर खर्च केले. पुढील महिन्यात होत असलेली महाविद्यालयाच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना कामाला लागणार आहे. त्याकरिता तयारीचे निर्देश त्यांनी दिले.या मेळाव्याल नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर, विजय सावरबांधे, नगरसेवक राकेश बिसने, नगरसेवक गोपाल नंदरधने, नीलकंठ टेकाम, पवनी तालुका सेवादल अध्यक्ष भगवान नवघरे, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले उपस्थित होते. संचालन तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे यांनी तर, आभार शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर यांनी मानले. बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले