शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गाई व म्हशीच्या दूध दरात घसघशीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:04 PM

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे वतीने १ जून रोजी येथे जागतिक दूध दिवस व दुग्ध उत्पादक मार्गदर्शन मेळावा साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी जागतिक दूध दिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३.५० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतीलिटर १ रुपये वाढ करण्यात आल्याचे सांगितले. गाईचे दूध २२.५० रुपयांवरून २६ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ३४ वरून ३५ रुपये करण्यात आल्याचे सांगितले.

ठळक मुद्देरामलाल चौधरी यांची घोषणा : दूध उत्पादकांना मार्गदर्शन, कृषी उद्योगावरही भर देण्याची गरज, जागतिक दूध दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे वतीने १ जून रोजी येथे जागतिक दूध दिवस व दुग्ध उत्पादक मार्गदर्शन मेळावा साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी जागतिक दूध दिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३.५० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतीलिटर १ रुपये वाढ करण्यात आल्याचे सांगितले. गाईचे दूध २२.५० रुपयांवरून २६ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ३४ वरून ३५ रुपये करण्यात आल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे तर विशेष अतिथी म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष बशीर पटेल, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, एनडीडीबीचे प्रतिनिधी डॉ.चंद्रशेखर डाखोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नितीन फुके, डॉ.हरिश भोंगाडे, नगरपरिषदचे उपाध्यक्ष आशू गोंडाणे, धनराज साठवणे तसेच भंडारा जिल्हा दूध संघाचे संचालक महेंद्र गडकरी, राम गाजीमवार, आशिष पातरे, नरेश धुर्वे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता साठवणे उपस्थित होते.यावेळी खासदार सुनील मेंढे बोलताना दूध व्यवसायाने ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती उंचावेल. शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता लहान मोठे कृषी उद्योग करून प्रगती साधण्याचे आवाहन केले.सुनील फुंडे पुढे म्हणाले की संघाचे विद्यमान संचालक मंडळाने कार्यभार हाती घेतला त्यावेळी संघ १२ कोटी रुपयाच्या तोट्यात होता. दूधाचे संकलन सुद्धा फक्त २२ हजार लिटर होते. आज संघाचे १७ कोटी रुपये राज्य शासनाकडे आहे. दुधाचे चुकारे प्रलंबित असले तरी संघ सर्व चुकारे देण्यास कटीबद्ध असून दूध उत्पादकांनी संघालाच चांगल्या प्रतीचे दूध देण्याचे आवाहन करण्यात आले. माजी खासदार मधुकर कुकडे यांनीही दुग्ध व्यवसाय हा खºया अर्थाने ग्रामीण भागाच्या उन्नतीचा व्यवसाय असल्याचे सांगितले.यावेळी डॉ.नितीन फुके, डॉ.चंद्रशेखर डाखोळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले. त्यांनी दुधाची विद्यमान स्थिती उपस्थित दूध उत्पादक शेतकरी व मान्यवरांना मार्गदर्शनात सांगितले.संचालन संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी तर आभार दूध संकलन विभाग प्रमुख आनंद पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.