रूपचंद सोनवणे हे नेहमीप्रमाणे ही गुरे घेऊन जंगल परिसरात चराईसाठी नेले असता गायी चरत असताना मागून पट्टेदार वाघाने थेट गुराख्यावर हल्ला चढविला. यात सोनवणे याच्या मानेवर, पायावर व पाठीवर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. रूपचंदने आरडाओरड केली असता दुसरे गुराखी त्याच्या मदतीला धावून जाताच वाघाने तेथून पळ काढला. जखमीला उपचारासाठी नाकडोंगरी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात हलविले, परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. तुमसर तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची दहा दिवसांतील लागोपाठ तिसरी घटना समोर आली असल्याने आष्टी लोभी परिसरातील नागरिकांत वाघाची दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने गावाकडे येत असलेल्या हिंस्र प्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची गरज आहे. वनविभागाने गावालगत राखीव जंगलव्याप्त भागात तारांचे कुंपण लावण्याची मागणी रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी केली आहे.
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:39 AM