शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:47 PM

आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी केले.

ठळक मुद्देदादासाहेब इदाते : साकोली येथे मासेमारांचा महामेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी केले.साकोली येथे रविवारला परेड ग्राऊंड मैदानावर मत्स्य सहकार महर्षी खासदार स्व. जतिरामजी बर्वे यांचा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मासेमारांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्टीजन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव हिवलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बर्वे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक बर्वे, प्रमोद काळबांधे, दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, भंडारा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जेष्ठ साहित्यिक माणिक गेडाम, कृष्णाजी नागपूरे, के. एन. नान्हे, राजेंद्र बढीये, धर्मपाल शेंडे, टेकचंद मारबदे, चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे यशवंत दिघोरे, संजय केवट आदी उपस्थित होते.दादासाहेब इदाते म्हणाले, शेवटच्या घटकांत मोडणाऱ्या विमुक्त भटके मासेमार समाजाला शासनाकडून सर्व सोयीसवलती देऊन प्रगत समाजाच्या बरोबरीने आणावे लागेल. भटक्या-विमुक्तांसाठीही कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यात यावा. आदिवासींसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय आहे. त्याच धर्तीवर या समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावे. भटक्या विमुक्त जातीत येणाºया हा मासेमार समाज प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आहे. त्यामुळे एका समाजाला देशभर एकाच प्रवर्गाचा दर्जा देण्यात यावा, गत तीन वर्षांत ३६ राज्यातील एक हजार ६५८ जातीच्या लोकांना भेटलो. त्यांच्या सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास केल्यावर त्या आधारे इदाते आयोग तयार करून २० ठळक मागण्या केल्या आहेत. भटके, विमुक्त, मच्छिमार, विशेष मागासवर्गीय अशा उपेक्षित व वंचित जमातीच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाही तर, पुढच्या निवडणुकीत आम्ही आमचे काम करू, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.सदाशिव हिवलेकर यांनी भारत सरकारने इदाते आयोग लागू करावा, भटक्या-विमुक्तांना घटनात्मक संरक्षण द्यावे, मासेमारांसाठी कल्याणकारी धोरण लागू करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांत स्वतंत्र आरक्षण द्यावे, तलावांची लीज पूर्ववत करावी या मागण्या केल्या.यावेळी दीनानाथ वाघमारे, डॉ. योगेश दुधपचारे यांनी मार्गदर्शन केले. महिला कार्यशाळेत महिला संघर्ष वाहिनीतर्फे शिक्षण, रोजगार, बचतगट आदी विषयांवर अर्चना डोंगरे, भाग्यश्री ठाकरे, प्रणिती मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. योगेश दुधपचारे यांनी केले. आभार प्रणिती मेश्राम यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाोसाठी अशोक शेंडे, उमराव मांढरे, हरिश्चंद्र शहारे, यशवंत दिघोरे, राहुल पडाळ, मनोज केवट, अमोल बावणे, वासुदेव खेडकर, मनिराम मौजे, हर्षल वाघमारे, सूनिता मोहनकर यांनी सहकार्य केले.