लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई यांनी केले.राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि समर्थ विद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शंकरराव भदाडे यांच्या स्मृति प्रीत्यर्थ ग्रेट भेट कवी आणि कलावंतांशी कार्यक्रम समर्थ विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी लोकनाथ यशवंत लाभले होते. कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता वर्ग १० ते एम. ए. पर्यतच्या अभ्यासक्रमाला असून प्रत्यक्ष कवींनी कविता सादरीकरण केले.कवी लोकनाथ यशवंत यांनी विद्यार्थ्यांना आपले ज्ञान हे व्यापक करा, लहान लहान गोष्टी मधून मार्ग काढायला शिकले पाहिजे. आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, मी दहाव्या वर्गात तीनदा नापास झालो मात्र आज एम. ए. ला कविता आहे, हे केवळ माझ्यातील कविमनामुळे सिद्ध झाले. माझी कविता ही गरीब, दु:ख, दिन हे जिथे असेल, त्यांच्या उत्थानासाठी लिहिलेली आहे.सुप्रसिद्ध सिने अभिनेता गिरीश पांडे यांनी सांगितले की, वाचन, मनन आणि लेखन हे या विश्वाचे गमक आहे. मराठी बोलणे लिहिणे यातून आपले व्यक्तिमत्व कळते. मी अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करत असतांना त्यांच्या भाषिक समृद्धतेचा संस्कार अनुभवता आला. आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक दा. ई. प्रधान, डॉ संजय निंबेकर, डॉ सुरेश खोब्रागडे, किशोर आळे, राजेंद्र भदाडे, विकास खेडीकर, प्रशांत ढोमने, श्रीकृष्ण पटले, शिवलाल निखाडे, अॅड कोमलदादा गभणे, अतुल भांडारकर, विजया घनमारे, सी. एम. बागडे, कारवट, देशपांडे, ग्रंथपाल पवन पडोळे यांच्यासह तालुक्यातील कवी उपस्थित होते. प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर, संचालन अक्षय मासुरकर तर आभार गोवर्धन शेंडे यांनी मानले.
सावली निर्माण करण्यासाठी उन्हातच उभे राहावे लागते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:26 PM
आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई यांनी केले.
ठळक मुद्देगिरीश पांडे : लाखनी येथे ग्रेट भेट कवी कार्यक्रम