जुगार आणि अवैध दारूच्या प्रकरणातही घट झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये जुगाऱ्याच्या ३४८ केसेस करण्यात आल्या हाेत्या, तर २०२० मध्ये २७७ घटनांची नाेंद घेण्यात आली. अवैध दारू प्रकरणात गतवर्षी १४७१ केसेस दाखल झाल्या असून, २०१९ मध्ये ही संख्या १५७६ हाेती. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव रुजू हाेताच त्यांनी पाेलीस दलात व्यापक फेरबदल केले. अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे सक्त निर्देश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख घटत आहे. यासाेबत काेराेना लाॅकडाऊनमुळे नागरिक घरातच हाेते, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळेही घटना कमी झाल्या.
बाॅक्स
चाेरीच्या घटनात वाढ
लाॅकडाऊनच्या काळातही जिल्ह्यात गतवर्षी चाेरीच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येते. दराेडा, घरफाेडी आदी घटना तुलनात्मकदृष्ट्या कमी झाल्या असल्या तरी चाेरीच्या घटना वाढल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये ३० नाेव्हेंबरपर्यंत चाेरीच्या ४०२ घटनांची नाेंद करण्यात आली हाेती. गतवर्षी नाेव्हेंबरपर्यंत ४९० चाेरीच्या घटनांची नाेंद करण्यात आली. ८८ चाेरीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स काेट
गुन्ह्यांची संख्या दरवर्षी बदलत असते. गतवर्षी २०२० मध्ये काेराेना लाॅकडाऊनमुळे नागरिक घरातच हाेते. पाेलिसांचा बंदाेबस्तही तगडा हाेता. रात्रगस्तही वाढविण्यात आली हाेती. त्यामुळे गुन्ह्याचा दर घटला आहे. चाेरीच्या प्रकरणात बाहेरून आलेल्या व्यक्तींनी चाेरी केल्याचे पुढे आले. त्यामुळे चाेरींच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. चाेऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययाेजना तयार केली आहे.
वसंत जाधव
जिल्हा पाेलीस अधीक्षक भंडारा