चार महिन्यांपासून वेतन अडले : जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, डोंगरगाव, आंधळगाव व जांब येथील शिक्षकांची व्यथाभंडारा : जिल्हा परिषद हायस्कुल डोंगरगाव, आंधळगाव व जांब येथील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्यांपासून मे या चार महिन्याचे वेतन झाले नसल्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहेआतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांची गंभीर बाब म्हणून दखल घेतली नाही. गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी लिपीक यांच्या कामचलाऊ वृत्तीमुळे वेतन होण्यास विलंब होतो. वेतनाच्या विलंबामुळे व्याजाचेच (सोसायटीच्या) शिक्षकांचे कंबरडे मोडले आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ पासून तीन महिने शिक्षकांचे उशिरा वेतन होत आहे.जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या संघटना कार्यरत आहेत. पण त्या केवळ संस्थेच्या निवडणुकीपुरती मर्यादित आहेत. त्यांना शिक्षकांच्या कुटुंबाविषयी काही देणे घेणे नाही. फक्त संस्थेत निवडून आल्यावर मालामाल बनण्याचे धडक प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषद हायस्कुल डोंगरगाव, आंधळगाव व जांब येथील शिक्षकांचे चार महिन्यांपासून पगार झाल्या नसल्यामुळे त्यांचे कुटुंब मानसिक व आर्थिक तणावात जगत आहेत. मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड व त्यांचा लिपीक वर्गाला पगाराविषयी विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देतात. यांना शिक्षकांच्या कुटुंबाच्या उपासमारी विषयी काही सोयरसूतक नाही, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. शासनाच्या योजना राबविताना शिक्षकांना मूल्य शिक्षणाचे धडे देतात. शिक्षकांकडून कार्यक्रम करून घेतात, पण पगाराविषयी एकही शब्द बोलत नाही. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, खासगी माध्यमिक शिक्षकांचे पगार होतात. मग हेतूपुरस्पर जिल्हा परिषद हायस्कुल डोंगरगाव, आंधळगाव व जांब येथील शिक्षकांचेच् ावेतन का होत नाही?, हे अनुत्तरीय आहे. वेतन उशिरा होण्यामागे संबंधित जबाबदार मुख्याध्यापक, अधिकारी कर्मचाऱ्यांविरुध्द यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद हायस्कुल डोंगरगाव, आंधळगाव व जांब येथील शिक्षकांच्या कुटुंबांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. (नगर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट
By admin | Published: July 02, 2015 12:44 AM