लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस जमिनीचा खालावत चाललेला पोत कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिकांची फेरपालट करुन कडधान्य पिकांची लागवड करणे गरजेचे असल्याचे मत भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी व्यक्त केले.तालुक्यातील खमारी बुटी येथे भंडारा तालुका कृषी विभागाच्यावतीने आयोजित जागतिक कडधान्य दिन कार्यशाळेत ते बोलत होते.कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकºयांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले. भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक अहिर यांनी शेतकºयांना रासायनिक खताचा अतिरेक कमी करून सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगितले.भंडारा तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मागदर्शन केले. खमारी मुख्यालयाच्या कृषि सहाय्यक हेमा तिडके यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कडधान्यपिके फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून कृषि सहाय्यक गिरीधारी मलेवार यांनी मार्गदर्शन केले. संचालन आत्माचे सतीश वैरागडे यांनी केले. तर आभार कृषी सहायक हेमा तिडके यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीधारी मलेवार यांनी सहकार्य केले.
कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पिकांची लागवड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 6:00 AM
कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकºयांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले.
ठळक मुद्देअविनाश कोटांगले : खमारी येथे जागतिक कडधान्य दिन