शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जनसमुदाय उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:26 PM

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाई डोह व लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीतिरावरील शिवतिर्थावर आज भरलेल्या यात्रेत हजारो भक्तांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले.

ठळक मुद्देदुर्गाबाई डोह, शिवतीर्थ यात्रा

संजय साठवणे/देवानंद बडवाईक/ मुखरू बागडे।आॅनलाईन लोकमतसाकोली/कुंभली/पालांदूर : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाई डोह व लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीतिरावरील शिवतिर्थावर आज भरलेल्या यात्रेत हजारो भक्तांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले.दुर्गाबाई डोह यात्रेत पहाटेपासूनच भाविकांनी चुलबंद नदीत आंघोळ करून देवीचे दर्शन घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनातर्फे आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, महाप्रसाद आदी सेवा भाविकांसाठी केल्या आहेत. डोह किती खोल आहे याचा अंदाज कोणालाच नाही. मात्र डोह कधी आटतच नाही. या यात्रेला किती काळ लोटला याची माहिती नाही. मात्र नवसाला पावणारी ही दुर्गाबाईची यात्रा असंख्य भाविकांच्या साक्षीने याही वर्षी फुलली. मकरसंक्रांतीच्या पर्वावर ही यात्रा सुरु होते. ही यात्रा चार ते पाच दिवस चालते. या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने तसेच पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंची विक्री केल्या जाते. यात लाखो भाविक दर्शनाला येतात. या निसर्गरम्य ठिकाणी निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला आहे. पालांदूर : चुलबंद नदीकाठावरील शिव मंदिरात मकरसंक्रातीनिमित्त शिवतिर्थ समितीने यात्रा आयोजित केली. यावेळी प्रबोधनात संदीपपाल महाराजांनी, शेतकºयांनी हिंमत न हरता जीवनातील प्रत्येक संकट कोणतेही व्यसन करू नका. व्यसनापासून लांब राहा. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे वाचन करून जीवनात आनंद मिळवा. असे मौलीक प्रबोधन सप्तखंजेरीवादक हभप संदीपपाल महाराज यांनी केले. यावेळी माजी खासदार नाना पटोले यांनी शिवतिर्थावर येऊन दर्शन घेतले. यावेळी खुनारीच्या सरपंच कल्पना सेलोकर, कवलेवाडाचे सरपंच केशव बडोले, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, उल्हास भालेराव, पंचायत समिती सदस्य मोनाली गाढवे, विनोद कठाणे, संस्थापक अध्यक्ष डमदेव कहालकर, माजी सरपंच हेमंतकुमार सेलोकर, सुधीर राघोर्ते, महादेव निंबार्ते, पोलीस पाटील सुनिल लुटे, चंद्रशेखर सेलोकर, जितेंद्र कठाणे, टी.एम. निंबार्ते, जगदीश बांगरे, ताराचंद निंबार्ते आदी उपस्थित होते. गोपालकाल्याची दहीहांडी अभियंता नरेंद्र वाघाये यांच्या हस्ते फोडण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवतिर्थावर महाप्रसाद माजी आमदार सेवक वाघाये यांच्याकडून करण्यात आले होते. हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात शिवतिर्थावर हजेरी लावून आशिर्वाद घेतले.