इयत्ता बारावीसह उच्च शिक्षणाच्या प्रवेशप्रक्रीयेसाठी आवश्यक असलेले जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आरक्षीत जांगावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणीसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्ज सादर करण्यात येत आहे. जात पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांसह उमेदवारांच्या जिल्हा जात पडताळणीच्या कार्यालयात रांगा लागत आहेत. जात पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समीती कार्यालयात प्रचंड गर्दी हाेत आहे. त्यामध्ये माॅस्कचा वापर, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नाही. विद्यार्थ्यांकडून या नियमांचे पालन हाेत असले तरी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या बहुतांश उमेदवारांकडून नियमांचे पालन हाेत नाही. त्यामुळे काेराेना विषाणू संसर्गाचा धाेका वाढण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.
विद्यार्थी
शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणत्र मिळविण्यासाठी दरराेज जिल्ह्यातील ६० ते ७० विद्यार्थ्यांकडून जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर हाेत आहे. त्यामध्ये एसटी प्रवर्ग वगळून ओबीसी, एससी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाचा समावेश आहे. इयत्ता बारावी डीएड, एमबीए, एलएलबी, सीईटी, अभियांत्रीकी आदी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश दिसून येताे.
उमेदवार
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीत आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्यात येत आहे. दरराेज ५० ते ७५ उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर हाेत आहे.
राेज १५० च्या वर अर्ज
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी तसेच उमेदवारांकडून दरराेज दिडशेच्यावर अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीसमीतीकडे प्राप्त हाेत आहेत. विद्यार्थी व ग्रामपंचायती निवडणूकीतील विजयी उमेदवारांना सीसीव्हीआयएस या वेबसाईडवरुन त्यांच्या मेलवर ऑनलाईन पध्दतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे.
प्रशासनातर्फे दक्षता
विद्यार्थी व ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची जात पडताळणीसाठी गर्दी हाेत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांनी मास्क, रुमालचा वापर करण्यासह फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात वेळाेवेळी सूचना देण्यात येत आहे. कार्यालयाच्या प्रवशेद्वारावर असलेल्या सुरक्षा गार्ड काेराेनाचे नियम न पाळणाऱ्यांना आत प्रवेश देत नाहीत. येथे सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आले आहे.
काेट
जात पडताळणीसाठी गर्दी लक्षात घेता विद्यार्थी व उमेदवारांसाठी स्वतंत्र दाेन काऊंटर उघडण्यात आले आहे. तसेच २५, २६ व २७ या सुटीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्यात आले असून जात पडताळणी सबंधीचे अर्ज स्विकारण्यात येत आहे. काेराेनाचा संभाव्य धाेका लक्षात घेता आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात येत असून नागरिकांना तशा सूचना वारंवार देण्यात येत आहे.
- अमीत सराेदे, उच्चश्रेणी लघुलेखक -१, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, तुमसर