मोहाडी : स्वत:च भविष्य, व्यवहार, समाजातील बाबी लहान वयात विद्यार्थी समजायला लागला आहे. यशस्वी व्यक्ती पुस्तकांना गुरू मानतात. गैरमार्गाने जीवनात यशस्वी होवू शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. बुद्धिमत्ता, वातावरण, अनुवंशिकता, परिस्थितीनुसार घडते. व्यवहारात मेरीट असणं महत्वाचे आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाला नोकरीशी जोडू नये. शिक्षण हे सुसंस्कृत होण्यासाठी असते, असे प्रतिपादन मोहाडीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले.महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील वार्षिक स्रेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी अतिथी म्हणून तहसीलदार डहाट बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाती हटवार होत्या. अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) माया देशमुख, मुख्याध्यापक राजकुमार बांते उपस्थित होते. बांते यांनी शाळेची तीस वर्षांची वाटचाल, शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम व स्रेहसंमेलनाचे महत्व विशद केले. स्रेहसंमेलनात हंडीफोड, बादलीत दगड घालणे, स्मरणशक्ती, रांगोळी, चमचा गोळी, वादविवाद, एकल नृत्य, समुह नृत्य, नाटीका आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्मृतीचिन्ह स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार स्वरूपात वाटप करण्यात आले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विपूल माटे, मोरेश्वर शेंडे, पल्लवी बोंदरे, प्रियंका आगाशे, सविता डोकरीमारे, काजल शहारे, शोभा आगाशे, नितीन तिजारे, आकाश नखाते, महिमा गेडाम, मयुरी वैद्य, अनिता साठवणे, विकास तिजारे, रोशन माकडे, प्रजत बाभरे, अंगद सेलोकर, दर्शन शेंडे, गीता ईश्वरकर, ज्योती राघोर्ते, संचिता ईश्वरकर, मंजूषा आगाशे, प्रियंका आगाशे, पूनम ठवकर, कल्पना मेश्राम, अरूणा सार्वे, मोनाली भगत, शोभा आगाशे, प्राची बाभरे, श्रीकांत शेंडे, आरती नखाते, पल्लवी बाळबुद्धे यांना बक्षिस पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. संचालन हेमराज राऊत व आभार प्रदर्शन धनराज वैद्य यांनी मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी गजानन वैद्य, हंसराज भडके, शोभा कोचे, वर्षा ढोमणे, श्रीहरी पडोळे, मोहन वाघमारे, लिलाधर लेंडे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षणातून सुसंस्कृत मनुष्य घडतो
By admin | Published: January 01, 2015 10:56 PM