देवानंद नंदेश्वर ।आॅनलाईन लोकमतभंडारा : उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. त्याठिकाणी सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळतो. मात्र भंडारा येथे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त आहे. परिणामी, ग्राहक न्यायाच्या प्रतिक्षेत ताटकळत आहेत. मागील सहा महिन्यांपासून ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत असल्याने अनेक जण न्यायापासून वंचित ठरले आहेत.भंडारा जिल्हा तक्रार निवारण मंचात सहा महिन्यांपासून अध्यक्ष नसल्यामुळे अनेक प्रकरणे पडून आहेत. या सहा महिन्यात महावितरण कंपनी, उत्पादक कंपनी, बँक, बांधकाम व्यावसायिक व शेती व्यवसायामध्ये विविध कंपन्यांनी दिलेल्या बिलांमधून अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी विविध कारणास्तव ग्राहक मंचामध्ये धाव घेतली आहे. परंतू अध्यक्ष नसल्यामुळे सहा महिन्यांपासून एकालाही न्याय मिळालेला नाही. गणेशपूर मार्गावर निवारण मंचची प्रशस्त ईमारत आहे. या कार्यालयात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयावर शासनाचा ५० ते ६० लाख रूपये वार्षिक खर्च होतो. परंतू अलिकडे अध्यक्ष नसल्यामुळे तक्रारदारांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.अध्यक्षपद भरतीची प्रक्रिया १० पासूनजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदाची मुलाखत प्रक्रिया १० ते २४ जानेवारीपर्यत ठेवण्यात आली आहे. या मुलाखतीतून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. त्यानंतर प्रलंबित प्रकरणांचे निराकरण होणार असल्याची माहिती ग्राहक मंच कार्यालयातून मिळाली आहे.अध्यक्षांसह चार पदे रिक्तजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयात अध्यक्षांसह अधीक्षक, अभिलेखापाल, शिपाई असे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. ‘जागो ग्राहक जागो’ ही जाहिरात करण्यापलिकडे सरकारने फारशी जागृतीसाठी केली नसल्याचे येथे दिसून येत आहे.कायद्यापासून ग्राहकच वंचितभंडारा जिल्हा व तालुका प्रशासनातर्फे २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात आला. १९८६ साली या तारखेला ग्राहक संरक्षण कायदा पास झाला. या कायद्याच्या कक्षा वेळोवेळी रुंदावण्यात आल्या. हा कायदा सुटसुटीत असून, त्यांची यथायोग्य अंमलबजावणी झाली तर ग्राहकांवर अन्याय करणाºयांना नक्की जरब बसू शकेल. पण या संरक्षण कायद्यापासून ग्राहकच वंचित असल्याचा अनुभव आहे.ग्राहक मंचावरील भार कारणीभूतकमी खर्च व प्रकरणांचा झटपट निपटारा करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असलेल्या ग्राहक मंचांवर कामाचा भार वाढत आहे. वाढत्या जागरुकतेमुळे फसवणूक झाल्यावर दाद मागणाºयांची संख्या वाढू लागली आहे. या ग्राहक मंचावर कामाचा तसेच प्रलंबित प्रकरणे वाढतआहे.वेबसाईटही ‘आऊटडेटेड’जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष एम.जी. चिलबुले हे सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र शासकीय वेबसाईटवर अद्यापही चिलबुले यांच्यापूर्वी असलेले तत्कालीन अध्यक्ष ए.डी. आळशी यांचे नाव आहे. त्यांचा पाच वर्षाचा कालावधी २७ जानेवारी २०१९ पर्यत असल्याचे नमूद आहे. ही माहिती ‘अपडेट’ करण्यात आलेली नाही.
ग्राहक मंच कार्यालयात तक्रारदारांना ‘तारीख पे तारीख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 10:14 PM
उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते.
ठळक मुद्देग्राहक मंच अध्यक्षाविना : पदभरती प्रक्रियेत उदासीनता