अडयाळ : मुदत संपूनही असंख्य ग्राहकांना पैसे न मिळाल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. हा प्रकार अड्याळ येथील सहारा बॅंक शाखेतून असून याप्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणीही ग्राहकांनी केली आहे.
अडयाळ येथील सहारा शाखेत असंख्य ग्राहकांनी विश्वासापोटी खाते उघडले. कुणी रोजचे दहा तर कुणी वीस रुपये भरले. कुणी मोठी रक्कम एकाच वेळी फिक्समध्ये घातली. आता मुदत संपूर्ण होऊन कुणाला तीन तर कुणाला सहा महिने झाले. काही ग्राहकांना तर तब्बल एक वर्ष उलटून गेला पण रक्कम मिळालेली नाही. पैेसे मिळतील या आशेने ग्राहक अडयाळ येथील शाखेत चकरा मारीत आहे. गावात याआधी एका पतसंस्था जी बुडाली तिच्या ग्राहकांना गेली तीन वर्षे लोटूनही पैसे मिळाले नाही. त्यानंतर शेप महाबचत गटही बुडाले. आता ही बॅंक पण जर तशीच निघाली तर मग ग्राहकांनी दाद मागायची कुणाकडे यावर कुणीही बोलायला तयार नाही.
अडयाळ येथील सहारा बँक शाखेतील भंडारा येथील अधिकारी म्हणतात की, ग्राहकांना त्यांचे पैसे व्याजासह मिळतील. पण ते कधी मिळणार? यावर मात्र काहीच बोलले नाहीत. दोन वर्ष झालीत कोरोनाच्या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला आहे.
बॉक्स
ग्राहक आल्यापावली जातात परत
ग्राहक एक एक रुपयांची काटकसर करून जीवन जगत आहेत. ज्या ग्राहकांना आज खरी गरज आहे आणि त्यांचेच पैसे त्यांना वेळेवर मिळत नसणार तर मग त्या ग्राहकांनी भीक मागून पोट भरायचे की मेल्यावर ती रक्कम मिळणार? असाही संतप्त सवाल मुदत भरून पैसे मिळत नसल्याची ओरड आहे. येथील अधिकारी आणि कर्मचारी सुध्दा या ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त करतात. पैसे कधीतरी मिळणार म्हणून ग्राहकांचे समाधान करून निराशाजनक स्थितीत परत पाठवित आहेत. पण हे अजून किती दिवस सुरू राहणार या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे.