लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संशयितरित्या फिरणाऱ्या दाेन युवकांची चाैकशी केली असता त्यांच्याकडे देशी कट्टा आढळला. याचवेळी दाेघांच्या ताब्यात असलेली वाहनेही चाेरीची असल्याचा दाट संशय आल्याने त्यांची झडती घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केली. अमन ओमप्रकाश ब्रह्मे (२२) व नीतेश भाेजलाल पटले (२१) दाेघे रा. काेसमी, जिल्हा बालाघाट अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी भंडारा शहरातील शास्त्री चाैक ते सिंधी काॅलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटाे रिपेअरिंग सेंटरजवळ दाेन युवक संशयितरित्या फिरताना आढळले. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाेहाेचले. दाेघांची विचारणा केली असता दाेघेही तरुण काहीच बाेलले नाहीत. याचवेळी त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच ३१ ईयू ८७२५ ची तपासणी केली. हे वाहन चाेरीचे असल्याच्या दाट संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यात असलेली एक देशी कट्टा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एकूण साहित्याची किंमत ४७ हजार २६५ रुपये सांगण्यात येते.स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय धर्मेंद्र बाेरकर यांच्या तक्रारीवरुन भंडारा पाेलीस ठाण्यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, एएसआय धर्मेंद्र बाेरकर, हेडकाॅन्स्टेबल राेशन गजभिये, विजय राऊत, कैलाश पटाेले, पाेलीस नायक श्रीकांत मस्के, प्रफुल्ल कठाणे, स्नेहल गजभिये, अमाेल खराबे, सचिन देशमुख, वाहन चालक बापू कुथे यांनी सहभाग नाेंदविला.
देशी कट्टा सात हजार रुपयांचा
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समयसूचकता दाखविल्याने दाेन्ही तरुणांना वेळीच पकडण्यात यश आले. तसेच त्यांच्या ताब्यातून अवैधरित्या वापरात असलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा जप्त करण्यात आला. देशी कट्ट्याची किंमत सात हजार रुपये सांगण्यात येते.