२५ लोक १४ के
बारव्हा: लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील शेतकरी दौलत तुकाराम तोंडरे यांची गट क्रमांक १६८ आराजी ३ तीन एकर मालकी हक्काची जमीन आहे. यांच्या जमिनीमधून मासळ वितरिकेच्या एल-३ थ्री लघुकालव्याचे २०१८ मध्ये बांधकाम करण्यात आले आहे. त्या अगोदर मुख्य डाव्या कालव्यावरून मासळ वितरिकेचे बांधकाम सुरू असताना गुंजेपार किन्ही येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला कमी आहे. म्हणून सुरू असलेल्या बांधकामात अडथळा आणून सुरू असलेले काम बंद पाडले. तेव्हापासून नहराचे बांधकाम किन्ही गुंजेपारच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत काम करून पुढील गोसे प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद केले. कालव्याचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे मुख्य डाव्या कालव्यावरून मासळ वितरिकेच्या कालव्यावरून पाणी वाहात येऊन किन्ही गुंजेपारच्या शेतकऱ्यांच्या शेतात साचत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
पुढे कालव्याचे बांधकाम नसल्यामुळे पाणि वाहात येऊन या शेतकऱ्याच्या शेतात साचून राहतो. त्यामुळे संपूर्ण धान पीक पाण्याखाली येऊन सडतो. शेतातील पाणी काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी संबंधित विभागाला तक्रारी दाखल केल्यानंतर सन-२०२० मध्ये एल थ्री कालव्यावर गट क्रमांक १६८ जमिनीमध्ये चुकीच्या ठिकाणी कालव्याच्या खालून मोठे सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. दोन्ही बाजूला १० दहा ते १२ फुटाचे टाके बनवून ४ चार ते ५ पाच लाख रुपये खर्च करून डिएचपीसी बनविण्यात आली. चुकीच्या ठिकाणी डिएचपीसी बनविण्यात आल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सबंधित विभागाचे अधिकारी आहेत. त्याच प्रमाणे मासळ वितरिकेच्या एल -३ थ्री लघु कालव्याचे बांधकाम माती भरून करावयाचे होते. मात्र काव्यावर माती भरतांना तांत्रिकदृष्ट्या कालव्याचे लेव्हल बरोबर नसून कालव्याच्या पारिवर कमी प्रमाणात मुरूम टाकल्या मुळे कालव्याच्या पारिवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे कालव्याच्या पोटामध्ये मध्ये भागात एकही मुरूम टाकलेला नाही.व कालव्यातून शेतामध्ये पाणी जाण्यासाठी बनविलेल्या सिमेंटच्या गेटा ह्या चुकीच्या पध्दतीने बनविण्यात आल्यामुळे कालव्याच्या प्रत्येक गेटवर टिन आडवे करून पाणी द्यावे लागते. आणि गेट जमिनीच्या खाली असल्यामुळे उलट शेतातील पाणी कालव्यामध्ये वाहात जातो. या साठी संबंधित विभागाला ४ चार वर्षांपासून सतत तक्रारी करूनसुध्दा आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न करता चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे.
प्रकरण अलगट येऊ नये म्हणून दोन वर्षांनंतर तहसीलदार लाखांदूर यांना अर्ज लिहून अतिवृष्टीमुळे नुकसान झाली आहे तरी तहसील कार्यालयामार्फत नुकसान देण्यात यावी. असे गोसे खुर्द डावा कालवा येथील अधिकाऱ्यांनी खोटे पत्रव्यवहार केले आहे. शेतकऱ्यांची नुकसान ही अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे झाली आहे. हे माहीत असूनसुद्धा हेतुपुरस्सर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नुकसान भरपाई न देता दरवर्षी नुकसान करण्याच्या उद्देशाने शासनाला अजूनपर्यंत माहिती दिली नाही. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.