च्या वडिलोपार्जीत शेतात एका व्यक्तीने अनधिकृत वीटभट्टी सुरू केली. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या. आता शेतातून विटा कालव्यावर ठेवल्या आहेत. मात्र, मातीचे उत्खनन आणि वीटभट्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत पवनी तहसील कार्यालयाकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. भंडारा येथील रेखा सुरचंद सुखदेवे यांची केसलवाडा (कातुर्ली) शिवारात दोन हेक्टर शेती आहे. वडिलोपार्जीत शेतात कोमलदास वासुदेव बारसागडे व मुकेश सहदेव देशपांडे यांनी कोणतीही परवानगी न घेता वीटभट्टी सुरू केली. यासाठी त्यांनी तलाठ्यांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. सुपीक जमिनीत वीटभट्टी लावल्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी होत असल्याने आता शेतातील विटा कालव्यावर नेवून ठेवल्या आहेत. याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. नुकसान भरपाईसह संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी रेखा सुखदेवे यांनी पवनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अनधिकृत वीटभट्टीने शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:27 AM