लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी व वैनगंगा नद्यांच्या संंगम तटावर असणाऱ्या बपेरा गाव शिवारात पुराच्या पाण्याचे दोन दिवस वेढा असल्याने धान पिकाचे मोठ्या नुकसान झाले आहे. यंत्रणेमार्फत केवळ पाहणी करण्यात आली असून सर्वेक्षण करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.वैनगंगा व बावनथडी नद्यांचे संगम बपेरा गावाच्या शिवारातील शेती आहे. गावातील शेतकऱ्यांना बावनथडी नदीचे पात्र कर्दनकाळ ठरले आहे. नदीच्या वाढत्या पात्रात ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. सधन शेतकरी आता शेतमजुर झाली आहेत. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपदा घोषित करित शासनाने हेक्टरी आर्थिक मदत दिली नाही. शेती नसताना शासन मात्र शेतसारा वसुल करित असताना शेतकऱ्यांच्या दबावानंतर शासनाने शेतसारा वसुलीला स्थगीती दिली आहे.या शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक सडले आहे. धान पीक अर्ध्यावर आले आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. वर्षभराचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. बपेरा शिवारातील शेतीच्या सर्वेक्षणाची अपेक्षा होती. परंतु यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहणी करिता काढता पाय घेतला आहेत. पुराची पाहणी केल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांची समस्या सुटणार नाही. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना सर्वेक्षणासाठी यंत्रणा फिरकलीच नाही. ग्रामपंचायत प्रशासनाला शेतकरी वारंवार विचारणा करित आहेत. स्थानिक यंत्रणेला धारेवर घेत आहेत. शासनाने त्वरीत सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.बपेरा गावाच्या शिवारात पुराच्या पाण्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करित आर्थिक मोबदला दिला पाहिजे.-भगत राऊत, सरपंच, बपेरा.
पुराने धान पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM
शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक सडले आहे. धान पीक अर्ध्यावर आले आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे.
ठळक मुद्देबपेरा परिसराला फटका : उत्पादनात घट होणार, पिकांचे सर्वेक्षण नाही