संजय सौंदरकर (वय ३०), टिकाराम बुराडे (५०) या दारू विक्रेत्यांसह केदार बुराडे (४५) यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तालुक्यातील डांभेविरली गावात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र, काही महिन्यांपासून गावात काहींनी दारू विक्री सुरू केली. त्यामुळे गावाची शांतता भंग पाऊण भांडणतंट्यात वाढ झाली होती. सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. त्यातच गवराळा गावातील महिलांनी संपूर्ण दारूबंदी केली. त्यापासून प्रेरणा घेत डांभेविरली येथील महिला दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या. त्यांनी आपला मार्चा अवैधरीत्या दारू विक्रेत्यांकडे वळविला. दोघांना दारूसह रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात नाईक दुर्योधन वकेकार, अंमलदार मनीष चव्हाण, टेकचंद बुरडे यांनी केली आहे.
डांभेविरली गावात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:39 AM