भंडारा : सोलापूर जिल्ह्यातल मोहोड येथे महावितरणमध्ये कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता विकास पानसने यांनी वीज कंपनीच्या दडपशाही व अमानवी वागणुकीमुळे त्रस्त होवून २९ डिसेंबर २०१६ ला आत्महत्या केली. या निषेधार्थ सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन या संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे देण्यात आले. भंडारा येथेही अभियंत्यांनी घटनेचा निषेध केला. संघटनेच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार पानसरे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सोलापूर येथील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. महावितरणमधील दडपशाही व महावितरण, महापारेषनच्या अभियंत्यावर वारंवार होणारे हल्ले तसेच क्रॉस तक्रारी, तिन्ही कंपन्यांचे बदली धोरण या विषयावर संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून संघटनेचे राज्य भरातील जवळपास ७०० पदाधिकारी जिल्ह्यातील मुख्य कार्यालय तथा पावर स्टेशनसमोर धरणे देत आहेत. मागण्यांची पुर्तता न झाल्याने ६ जानेवारीला तिन्ही वीज कंपन्यातील जवळपास १२ हजार अभियंते सामूहिक रजेवर जाणार आहेत. त्यानंतर ही मागण्या मान्य न झाल्यास कुठल्याही क्षणी बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. भंडारा येथील धरणा आंदोलनात सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे नागपुर परिक्षेत्र प्रादेशिक सचिव इंजि. हरिष डायरे, सहसचिव प्रशांत भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे देण्यात आले. यावेळी विश्वनाथ दुबे,पंकज आखाडे, विनय दलाल, अजय उमप, संदिप लाडके, रविंद्र कापगते, जिवनलता वडसकर, इंगळे, जिवने, हेमा यादव, स्वाती फटे, मंगेश कहाळे, वैभव पाथोळे, राजेंद्र नंदनवार, हेमंत आंबेकर, अजित जिचकार, शेंदरे. बाकरे, अनंत हेमके, निमजे, पंकज कोलते, कमलेश बाभरे, निलेश कळंबे, अशोककुमार ओझा, मिथुन सांगोळकर, अमोल जैस्वाल, धर्मेश चव्हाण, अभिषेक ठाकुर, ऐय्याज अहमद आदी अभियंते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सबॉर्डिनेट इंजिनिअर्स संघटनेचे धरणे
By admin | Published: January 06, 2017 12:48 AM