लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही. कमकासूर हे गाव सुसूरडोह गट ग्रामपंचायतीकडे येत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याची गावकºयांची तक्रार आहे.कमकासूर येथे इलेक्ट्रानिक विजेची व्यवस्था नाही, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नाही. आरोग्य विभागाने येथील पाणी तपासणी केली असता पिण्यास अयोग्य ठरविले. गावातील नाल्याचे केरकचरा व माती अपसा केलेला नाही.खांबावर पथदिवे नाहीत.गावाला लागून असलेल्या जंगलामुळे जंगली प्राण्याची भीती आहे. गावातील हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडरची व्यवस्था ग्रामपंचायत करीत नाही. दूषित पाणी गावकºयांना उपयोगात आणावे लागते. पुनर्वसन ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कमकासूर या गावात शंभर टक्के आदिवासी लोक असून कायद्यानुसार आदिवासींना भूमीहीन करता येत नाही. कमकासूर पुनर्वसन गावाच्या अवतीभोवती दुसºया गावातील लोक स्वत:ची मालकीची जमीन असून त्यांनी अतिक्रमण केले आहेत. त्यांनाच प्रशासकीय विभागाचे जमिनीचे पट्टे दिले आहे. ज्या आदिवासीच्या जमिनी बळकावून बावनथडी प्रकल्प तयार झाला आहे. त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून जमिन मिळाली नाही. त्यांना भुमिहिन केले आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. गाव पुनर्वसन झाल्यापासून ग्रामपंचायत, तहसील विभाग, पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद इतर प्रशासकीयविभागाने अजुनपर्यंत लोकांची समस्या जाणून घेतलेली नाही व त्यांना नागरिक व्यवस्था करुन दिलेली नाही.येथील आदिवासी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. वरील समस्यांना कंटाळून आदिवासी समाज आता जुन्या गावाकडे शेतीवाडी करण्यास व वनकामे करण्यास स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत. अन्यथा महसुल विभागाने उरनिर्वाह करीत प्रत्येक कुटूंबाला जमीन उपलब्ध करुन द्यावी.कमकासुर येथील विद्युतमिटर ५ वर्षापूर्वीच विद्युत विभागाने काढून नेल्याने शाळा डिजीटल करता येत नाही. याचा शैक्षणिक विकासावर वाईट परिणाम होत आहे. जुनी सुुसुरडोह ग्रामपंचायत कमकासुर गावाकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे व सद्या स्थितीत १२ ते १५ किलो मिटर अंतर असल्याने कमकासुर येथील गावकºयांना त्रास होत आहे. तरी कमकासुर, रामपूर, हमेशा व गायमुख देवस्थान हे गाव मिळून नवी ग्रामपंचायत तयार करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.
‘कमकासूर’ समस्यांनी ग्रासलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 10:29 PM
तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही.
ठळक मुद्देनागरी सुविधांचा अभाव: पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच