शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

एक दिवस आधी पण तब्बल चार महिन्यांनी पोहचले केंद्राचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागाची पाहणी : प्रशासनाची तारांबळ, पिंडकेपार व खाकसीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल चार महिन्यानंतर केंद्राचे पथक गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले. शुक्रवारी असलेला नियोजित दौरा रद्द करत एक दिवस आधीच पथक जिल्ह्यात पोहचल्याने शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार आणि पवनीच्या खाकसीला भेट दिली. त्यावेळी अद्यापही मदत मिळाली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी या पथकापुढे सांगितले.भंडारा जिल्ह्यात २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि महापूर आला होता. पिकासह घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने सर्व्र्हेक्षणही करण्यात आले. दरम्यान केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार होते. मात्र नियोजित दौरा रद्द करत केंद्राचे पथक गुरूवारीच जिल्ह्यात दाखल झाले. कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग व महेंद्र शहारे यांच्या नेतृत्वात पथक दुपारी जिल्ह्यात आले. अचानक आलेल्या या पथकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पथकाने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंडकेपार आणि पवनी तालुक्यातील खाकसी गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योेगेश कुंभेझकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कृषी सहायक संचालक रवींद्र भोेसले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा कृषी अधिकारी अविनाश कोटांगले उपस्थित होते. दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांनी धान्य प्रतवारीची माहिती पथकाला दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचा उतारा ३० टक्क्यापर्यंत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने पिंडकेपार गावाला भेट दिली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. तसेच शेतात, बांधावरही पथक पोहचले. यावेळी राकेश वंजारी, लक्ष्मण निंबार्ते, वसंत सार्वे या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यानंतर पवनी तालुक्यातील गावांनाही भेट दिली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मदत मिळाले नसल्याचे या पथकापुढे सांगितले. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला, कोरंभी रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त करून दळणवळण व्यवस्था सुरळीत केली. त्याबद्दल या पथकाने समाधान व्यक्त        केले. 

अतिवृष्टीत १४४ गावे प्रभावित  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावित झाली होती. पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. १९ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स्यव्यवसाय, वीज वितरण, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदींचेही मोठे नुकसान झाले. ही माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.

 

टॅग्स :floodपूर