भंडारा : खाजगी प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य नागपूरच्या वतीने १७ जानेवारी रोजी नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसीय अभ्यासवर्ग उमरेड रोड अजनी येथील निसर्गाच्या सानिध्यात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर व प्रमुख वक्ते राज्य कर्मचारी महासंघाचे अशोक थुल यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या व शिक्षणाप्रति शासनाचे उदासीन धोरण यातून शिक्षणविषयक घेतलेले घातक निर्णय तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कपातीचा शासकीय डाव उलथून पाडण्यासाठी शिक्षक संघटनाची भूमिका काय असावी? ११ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी शाळेतील शिपायाची पदे कंत्राटी मानधन तत्ववर भरण्याचे निर्णयाने शिपाई पदावर निर्बंध आले आहेत.आधीच राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची खैरात वाटून मराठी शाळां बंद करण्याचा राज्य शासनाचा घाट आहे. त्यामुळे भविष्यात मराठी शाळा व शिक्षकांचीही पदे गोठाविण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय शिक्षकांना देय असलेली चटोपाध्याय वेतन श्रेणी प्रशिक्षणाशिवाय लागू करावी किंवा प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करावी, अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिक्षकांचा महामोर्चा काढण्यासाठी शिक्षकांनी तयार राहावे असे आव्हान करण्यात आले असून याकरिता जिल्हानिहाय संघटन मजबूत करून संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. असे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांनी मत व्यक्त केले.
यावेळी राज्य कर्मचारी महासंघाचे अशोक थुल यांनी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा केंद्रप्रमाणे मिळण्यासाठी अतोनात संघर्ष करावे लागले.तर कामगारांचे नोकरीचे आठ तास करण्यासाठीही रक्ताचे पाट वाहिल्याच्या इतिहासाला उजाळा दिला.
या विभागीय अभ्यास वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व अमरावती येथील शिक्षकानी हजेरी लावली असून संघटनेचे केंदीय कार्यवाह विजय नंदनवार , ज्ञानेश्वर वाघ, संजय बोरगावकर,मोहन सोमकुवर, ,विलास खोब्रागडे, धनवीर कानेकर,दारासिंग चव्हाण, सुरजलाल वासनिक, सुनील मेश्राम, गोपाल मुर्हेकर,राजकुमार शेंडे, हेमंत कोचे, विजय आगरकर, लोकपाल चापले, अरुण नवरे,चंद्रशेखर पंचभाई,पवन नेटे, प्रमोद कुंभारे, ज्ञानेश्वर घंगारे,कल्पना काळबाडे, दिनेश ठाकरे,,बाळकृष्ण बालपांडे, अंजुम निषाद, ज्योती सूर्यवंशी, कुमुद बालपांडे,विद्या मोरे,रवींद्र जेणेकर आदी उपस्थित होते .