शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

टिप्परच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:07 AM

रेती वाहून नेणाऱ्या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १.३० वाजता तुमसरजवळील खापा चौकात घडली.

ठळक मुद्देखापा येथील घटना : वडिलांची प्रकृती चिंताजनक

ऑनलाईन लोकमततुमसर : रेती वाहून नेणाऱ्या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १.३० वाजता तुमसरजवळील खापा चौकात घडली.अफरोज इजराईल शेख (२६) रा.मोहाडी असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अफरोज शेख हा वडील इजराईल शेख (५६) व मावशी खैदून शेख (६५) रा.पारशिवनी यांना घेऊन दुचाकी (क्र. एमएच ३६/एन २९७९) ने तुमसरहून मोहाडीला परत जात होते. दरम्यान विरूद्ध दिशेने येणाºया टिप्पर क्र. (एमएच ४० एन ६९४८) ने तिरोडाकडे जाताना वळणावर टिप्परने जोरदार धडक दिली. दुचाकी टिप्परखाली येऊन टिप्परचे चाक अफरोजच्या डोक्यावरून गेल्यामुळे अफरोजचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात ईजराईल शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तुमसर येथे उपचार सुरू आहेत.खैरुन शेख यांना किरकोळ दुखापत झाली असून नशिब बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. घटनेची माहिती होताच पोलीस उपनिरीक्षक म्हैसकर, पोलीस शिपाई धावडे, बडोले, बुराडे यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नायब तहसीलदार पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघातस्थळी रूग्णवाहिका उशिराने आल्यामुळे जखमींना पोलीस वाहनातून रूग्णालयात नेण्यात आले.गतिरोधकाची गरजखापा चौकातूनच तुमसर शहरात जावे लागते. या चौकात गतिरोधक नाही. रामटेक, भंडारा, तुमसर, तिरोडा या चारही दिशेने येथूनच वाहने जातात. गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव जातात. अफरोजचा मृत्यू टिप्पर चालकाच्या निष्काळजीमुळे झाला. खापा चौकात कायमस्वरूपी पोलीस चौकीची गरज आहे. या चौकातून दिवसभरात सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक धावतात. एवढी रहदारी असताना पोलीस चौकीची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे तालुका मुख्यालय येथून हाकेच्या अंतरावर आहे. या विभागाने पुढाकार घेऊन गतिरोधक तयार करण्याची गरज आहे.खापा चौकात गतिरोधकाची गरज आहे. परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नाही. याशिवाय याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.-बालकदास ठवकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर.

टॅग्स :Accidentअपघात