शोध सुरू : रावणवाडी टी पॉर्इंटजवळील घटना लाखनी : टेकेपार ते खुर्शीपार मार्गावरील रावणवाडी टी पॉर्इंटजवळ रात्रीदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चितळ जागीच ठार झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यावर चितळाला जाळण्यात आले. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. भंडारा तालुक्यातील टेकेपार ते खुर्शीपार मार्गावर रावणवाडी हे पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांची सतत वर्दळ असते. १५ मार्चच्या रात्री दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका चितळाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात चितळाचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लता देशमुख, मिसार व सहकारी माणिक चौधरी यांचे कडून चितळाचे शवविच्छेदन करून घेतले. अखेर पंचासमोर चितळाला जाळण्यात आले. यावेळी वनविभागाचे एस. मेश्राम व अन्य वन कर्मचारी उपस्थित होत आहे. वनविभागाने या मार्गावर गस्त घालण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू
By admin | Published: March 17, 2017 12:23 AM